दिल्लीतील नेत्यांच्या नाराजीमुळे फडणवीसांचे विरोधी पक्षनेतेपद धोक्यात : मिटकरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2020 13:59 IST2020-02-23T13:51:09+5:302020-02-23T13:59:34+5:30
तर भाजपचे नेते अजूनही पराभवाच्या धक्क्यातून सावरले नाही. त्यामुळे सरकारवर टीका करण्यापलीकडे त्यांना काहीच सुचत नसल्याचेही मिटकरी म्हणाले.

दिल्लीतील नेत्यांच्या नाराजीमुळे फडणवीसांचे विरोधी पक्षनेतेपद धोक्यात : मिटकरी
मुंबई : विरोधी पक्षाकडून महाविकास आघडीच्या सरकारवर सतत होत असलेल्या आरोपावरून राष्टवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी भाजप आणि माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. दिल्लीतील भाजपचे नेते फडणवीस यांच्यावर नाराज असल्याने त्यांचे विरोधी पक्षनेतेपद जाण्याची शक्यता असल्याचं मिटकरी म्हणाले आहे.
मिटकरी म्हणाले की, महाविकास आघाडी अजून पुढील 25 वर्षे सत्तेत राहणार असून, फडणवीस यांनी काळजी करू नयेत. तर विधानसभा निवडणुकीत भाजपची सत्ता गेली. त्यांनतर झालेल्या जिल्हा परिषेदेच्या निवडणुकीत सुद्धा भाजपला विरोधात बसावे लागले आहे. त्यामुळे दिल्लीतील नेते फडणवीस यांच्यावर नाराज असून, त्यांचे विरोधी पक्षनेतेपद धोक्यात असल्याचे मिटकरी म्हणाले.
महाविकास आघाडीतील सर्वच मंत्र्यांची कामे चांगली सुरु आहे. तर भाजपचे नेते अजूनही पराभवाच्या धक्क्यातून सावरले नाही. त्यामुळे सरकारवर टीका करण्यापलीकडे त्यांना काहीच सुचत नसल्याचेही मिटकरी म्हणाले. तसेच राज्यात पुढेही आता महाविकास आघाडीचचं सरकार कायम राहणार असल्याचे मिटकरी म्हणाले.