Maharashtra Politics: “राज साहेबांवर वक्तव्य करताना जरा सांभाळून, नाहीतर करेक्ट कार्यक्रम होणार”
By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2023 04:44 PM2023-04-02T16:44:29+5:302023-04-02T16:46:32+5:30
Maharashtra News: राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांना व्हॉट्सअपवर धमकीचा मेसेज आला असून, याबाबत पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.
Maharashtra Politics: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार अमोल मिटकरी सातत्याने विरोधकांवर टीकास्त्र सोडताना पाहायला मिळत आहेत. भाजप, शिंदे गट तसेच मनसेवरही अमोल मिटकरी शेलक्या शब्दांत निशाणा साधत असतात. अशातच आता अमोल मिटकरींना धमकी मिळाल्याचे सांगितले जात आहे. राज साहेबांवर वक्तव्य करताना जरा सांभाळून, नाहीतर करेक्ट कार्यक्रम होणार, अशी धमकी देण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राज साहेबांवर वक्तव्य करताना जरा सांभाळून, नाहीतर करेक्ट कार्यक्रम होणार, अशी धमकी व्हाट्सअपवरून मिळाली आहे. यानंतर अमोल मिटकरी यांनी पोलिसांत तक्रार दिली असून, याबाबत ट्विट करून माहिती दिली आहे. यामध्ये, मत नसलेल्या सेनेच्या एका टुकार कार्यकर्त्याने मला करेक्ट कार्यक्रम करण्याची धमकी दिली. राज्यातील जात्यांध परिस्थिती पाहता सुरक्षेच्या दृष्टीने मी सिविल लाईन पो. स्टेशन अकोला या ठिकाणी तक्रार गुन्हा दाखल झाला आहे. आरोपीस तात्काळ अटक करावी हि विनंती, अशी मागणी अमोल मिटकरींनी यांनी ट्विटरवरून केली आहे. सोबत तक्रार दाखल केल्याचा फोटोही शेअर केला आहे. यात मुख्यमंत्री कार्यालय आणि देवेंद्र फडणवीस यांना टॅग करण्यात आले आहे.
पोलिसांनी अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली
याप्रकरणी पोलिसांनी अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली आहे. ठार मारण्याची धमकी व इशाऱ्याचा संदेश प्राप्त झाला असून मला व माझ्या कुटुंबीयांना धोका निर्माण झाला आहे. या गंभीर प्रकाराची दखल घेऊन सदर अज्ञात इसमावर तात्काळ कारवाई करून अटक करावी, असे अमोल मिटकरी यांनी म्हटले आहे. दुसरीकडे, रामनवमीच्या दिवशी अमोल मिटकरींनी ट्विटरवरून मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना जोरदार टोला लगावला होता.
मत नसलेल्या सेनेच्या एका टुकार कार्यकर्त्याने आज मला करेक्ट कार्यक्रम करण्याची धमकी दिली.राज्यातील जात्यांध परिस्थिती पाहता सुरक्षेच्या दृष्टीने मी सिविल लाईन पो. स्टेशन अकोला या ठिकाणी तक्रार गुन्हा दाखल झाला आहे.@CMOMaharashtra@Dev_Fadnavis आरोपीस तात्काळ अटक करावी हि विनंती pic.twitter.com/o4dFyGpbjY
— आ. अमोल रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) April 1, 2023
तथाकथित ‘हिंदूजननायक’ परदेश दौऱ्यावर पळाले
अमोल मिटकरी यांनी एक ट्विट केले होते. यामध्ये रामनवमी साजरी करण्याचा आदेश देऊन स्वतः मात्र यामध्ये सहभागी नसणारे तथाकथित “हिंदूजननायक” परदेश दौऱ्यावर पळाले. त्यामुळे आता रामनवमी बिचाऱ्या कार्यकर्त्यांनाच साजरी करायची आहे. याला म्हणतात , हंस चुगेगा दाना तिनका, कौआ मोती खायेगा, असे अमोल मिटकरी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले होते.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"