केवळ १० दिवसांत हे सगळं झालं; एकनाथ खडसेंनी सांगितल्या 'आतल्या' घडामोडी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2021 04:16 PM2021-03-18T16:16:52+5:302021-03-18T16:23:51+5:30

jalgaon municipal corporation election: शिवसेना भाजपचे नगरसेवक फोडण्यात यशस्वी झाली. हा करेक्ट कार्यक्रम कसा शक्य झाला, यावर राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे (eknath khadse) यांनी भाष्य केले आहे.

ncp leader eknath khadse react on shiv sena win and bjp loss in jalgaon municipal corporation election | केवळ १० दिवसांत हे सगळं झालं; एकनाथ खडसेंनी सांगितल्या 'आतल्या' घडामोडी

केवळ १० दिवसांत हे सगळं झालं; एकनाथ खडसेंनी सांगितल्या 'आतल्या' घडामोडी

Next
ठळक मुद्देएकनाथ खडसे यांनी सांगितला जळगाव पालिका विजयाचा करेक्ट कार्यक्रमया प्लानबाबत कुणालाही फारशी माहिती नव्हती - खडसेएकनाथ खडसेंची भाजपवर जोरदार टीका

जळगाव : जळगाव महानगरपालिकेवर (Jalgaon Mayor election) गेल्या अनेक वर्षांपासून भाजपची सत्ता आहे. मात्र, पहिल्यांदाच जळगाव महानगरपालिकेवर शिवसेनेची एकहाती सत्ता स्थापन झाली आहे. भाजप नेते आणि माजी मंत्री गिरीश महाजन यांचे जळगाव महानगरपालिकेवर वर्चस्व आहे. मात्र, तरीदेखील शिवसेना भाजपचे नगरसेवक फोडण्यात यशस्वी झाली. हा करेक्ट कार्यक्रम कसा शक्य झाला, यावर राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे (eknath khadse) यांनी भाष्य केले आहे. केवळ १० दिवसांत हे सगळं झालं. याबाबत कुणाला जास्त माहिती नव्हती, असे एकनाथ खडसे यांनी सांगितले. (ncp leader eknath khadse react on shiv sena win and bjp loss in jalgaon municipal corporation election)

जळगाव महानगरपालिकेत शिवसेनेची एकहाती सत्ता आली आहे. याबाबत फारसं कुणाला माहिती नव्हतं. गेल्या १० दिवसांत सूत्र हलवली. कामे होत नसल्यामुळे आणि भ्रष्टाचार वाढल्यामुळे सगळे नगरसेवक आणि जनता नाराज होती. त्यामुळे आमच्याकडे येण्यासाठी नगरसेवकांना फारसा आग्रह करावाच लागला नाही, असे खडसे यांनी सांगितले.

गुड न्यूज! आता राज्यातील हाफकिन करणार कोरोना लस उत्पादन; PM मोदींचा हिरवा कंदील

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची घेतली भेट

जळगाव महानगरपालिका निवडणुकीसंदर्भात १० दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसोबत चर्चा झाली. तुम्ही महापौरपदासाठी तुमचा उमेदवार दिला, तर मी मदत करू शकेन, नगरसेवक जमू शकतात. एकनाथ शिंदे, विनायक राऊत यांच्यासोबत चर्चा झाली. त्यानंतर नाराज नगरसेवकांना फार आग्रह करण्याची गरजच पडली नाही. यातील काही नगरसेवक मला आधीच भेटून गेले होते. मग हा सगळा प्लॅन ठरला, असे खडसेंनी सांगितले.

भाजपचे स्थानिक नेतृत्व गर्विष्ठ

भाजपच्या स्थानिक नेतृत्वामध्ये गर्विष्ठपणा आहे. नगरसेवकांना तुच्छ लेखणे, स्थानिक मागण्यांकडे दुर्लक्ष करणे हे होत होते. पक्ष नेतृत्वामुळेच नगरसेवकांना फार आग्रह करावाच लागला नाही. अनेक जण महिन्याभरापासून माझ्यामागे फिरत होते. गिरीश महाजनांविषयी प्रचंड नाराजी आहे, असा टोला खडसे यांनी लगावला.

दरम्यान, जळगाव महानगर पालिकेमध्ये सत्ताधारी भाजपाला पराभवाचा धक्का देत शिवसेनेने भगवा फडकावला आहे. भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात असून, त्यांचे मोठे अपयश असल्याचे म्हटले जात आहे. 

Web Title: ncp leader eknath khadse react on shiv sena win and bjp loss in jalgaon municipal corporation election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.