Maharashtra Politics: सुषमा अंधारेंचे ‘महाप्रबोधन’; सभा सुरु असतानाच आले गुलाबराव, भुवया उंचावल्या अन् चर्चांना उधाण

By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2022 09:08 AM2022-11-02T09:08:23+5:302022-11-02T09:09:28+5:30

Maharashtra News: शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील आणि ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्यात आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहेत.

ncp leader gulabrao deokar participated in shiv sena sushma andhare mahaprabodhan yatra in jalgaon | Maharashtra Politics: सुषमा अंधारेंचे ‘महाप्रबोधन’; सभा सुरु असतानाच आले गुलाबराव, भुवया उंचावल्या अन् चर्चांना उधाण

Maharashtra Politics: सुषमा अंधारेंचे ‘महाप्रबोधन’; सभा सुरु असतानाच आले गुलाबराव, भुवया उंचावल्या अन् चर्चांना उधाण

googlenewsNext

Maharashtra Politics: बाळासाहेबांची शिवसेना म्हणजेच शिंदे गट आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट यांच्यातील संघर्ष दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. बंडखोरांना अद्दल घडवण्यासाठी उद्धव ठाकरेंनी कंबर कसली आहे. यातच शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे या शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांच्या मतदारसंघात आयोजित महाप्रबोधन यात्रेत सहभागी झाल्या होत्या. यातच गुलाबराव पाटील आणि सुषमा अंधारे यांच्यात आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहेत. मात्र, महाप्रबोधन यात्रेची सभा सुरू असतानाच अचानक गुलाबराव मंचावर आले आणि सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसल्याचे सांगितले जात आहे. यावरून राजकीय चर्चांना उधाण आले आहे. 

शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांच्या मतदारसंघात शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांची सभा सुरू असताना या कार्यक्रमात राष्ट्रवादीचे काँग्रेसचे माजी मंत्री गुलाबराव देवकर यांची एन्ट्री झाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. यानिमित्ताने धरणगावातच मंत्री गुलाबराव पाटील शह देण्यासाठी उद्धव ठाकरे गट व राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्हीही एकवटल्याची चर्चा आहे. 

पाणीपुरवठा मंत्री असून पाणी देत नसाल तर राजीनामा द्या

उद्धव ठाकरे गटाच्या वतीने सुषमा अंधारे यांच्या महाप्रबोधन यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. ही यात्रा जळगावाच पोहोचली आहे. उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेचा कार्यक्रम असताना यावेळी राष्ट्रवादीचे माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी हजेरी लावली. देवकर हे मंत्री गुलाबराव पाटील यांचे कट्टर राजकीय विरोधक मानले जातात. यावेळी बोलताना, मंत्री गुलाबराव पाटील यांनी ५०-५० खोके आले आणि पुन्हा पाणीपुरवठा खात यांनी मागून घेतले. पाणीपुरवठा मंत्री मात्र यांच्याच धरणगाव येथे २५-२५ दिवस पाणी पुरवठा होत नाही. मग यांना मंत्री म्हणून राहण्याचा अधिकार नाही, राजीनामा द्या, असे आव्हान गुलाबराव देवकर यांनी दिले. 

दरम्यान, आम्ही उड्डाणपूल बांधला आणि उद्घाटन यांनी केले, यांनी एक काम केले असे दाखवून द्यावे आणि एक लाख रुपये घेऊन जावे, अशी खुले चॅलेंज गुलाबराव देवकर यांनी गुलाबराव पाटील यांना दिले.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: ncp leader gulabrao deokar participated in shiv sena sushma andhare mahaprabodhan yatra in jalgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.