Samruddhi Mahamarg: “टोल एवढा कसा? समृद्धी महामार्गाऐवजी लोक जुन्याच मार्गाने जाणे पसंत करतील”: जयंत पाटील

By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2022 08:44 PM2022-12-14T20:44:16+5:302022-12-14T20:45:08+5:30

Samruddhi Mahamarg: समृद्धी महामर्गावर एवढा टोल लावण्याचे कारण काय, अशी विचारणा जयंत पाटील यांनी केली आहे.

ncp leader jayant patil asked shinde fadnavis govt about samruddhi mahamarg toll price | Samruddhi Mahamarg: “टोल एवढा कसा? समृद्धी महामार्गाऐवजी लोक जुन्याच मार्गाने जाणे पसंत करतील”: जयंत पाटील

Samruddhi Mahamarg: “टोल एवढा कसा? समृद्धी महामार्गाऐवजी लोक जुन्याच मार्गाने जाणे पसंत करतील”: जयंत पाटील

googlenewsNext

Samruddhi Mahamarg: अलीकडेच पंतप्रधान मोदी यांनी समृद्धी महामार्गातील नागपूर-शिर्डी या महत्त्वाच्या टप्प्याचे लोकार्पण केले. अल्पावधीतच शेकडो वाहनांनी या समृद्धी महामर्गावरून प्रवास केला. या महामार्गाबाबत शिंदे-फडणवीस सरकारचे कौतुकही केले जात आहे. यातच महाविकास आघाडीच्या नेत्यांनी या महामार्गाच्या टोलवरून सरकावर टीका करण्यास सुरुवात केल्याचे पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी टोलबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करत समृद्धी महामार्गाऐवजी लोक जुन्याच मार्गाने जाणे पसंत करतील, असा दावा केला आहे. 

समृद्धी महामार्गासाठी भरावा लागणारा टोल चर्चेचा विषय ठरत आहे. हा टोल सामान्यांच्या आवाक्याच्या बाहेर असल्याचे सांगितले जात आहे. टोलच्या अवाजवी दरांचा मुद्दा अधिवेशनात उपस्थित करून त्याबाबत सरकारला जाब विचारणार आहे. प्रचंड मोठी गुंतवणूक त्या प्रकल्पात झाली आहे. आम्ही विधानसभेत मुख्यमंत्री आणि त्या खात्याच्या मंत्र्यांना विचारू की हा टोल एवढा कसा? त्याचे काहीतरी गणित किंवा हिशोब असेल. या निर्णयाप्रत ते का आले? त्यांचे उत्तर जर योग्य नसेल, तर त्याविरोधात आवाज उठवेन, असा इशारा जयंत पाटील यांनी दिला आहे. 

समृद्धी महामार्गाऐवजी लोक जुन्याच मार्गाने जाणे पसंत करतील

पुढे बोलताना जयंत पाटील म्हणाले की, आत्ता जे टोलचे दर आहेत ते सामान्य माणसाला परवडणारे नाहीत. एवढ्या मोठ्या प्रमाणावर एका रस्त्याला टोल घेतला, तर लोक त्या रस्त्यावरून जाण्याऐवजी जुन्या मार्गाने जाणेच जास्त पसंत करतील. या रस्त्यावर इतका टोल लावण्याचे कारण काय? हे आम्ही त्यांना विधानसभेत विचारू. विदर्भातील जनतेसाठी ही फार मोठी अडचण आहे. रस्ता उत्तम आहेच. पण मग विमानही आहेच की. विमानाने जास्त लवकर येता येईल. त्यामुळे राज्य सरकारने स्वत: काहीतरी विचार केला पाहिजे. जनतेला कमी भुर्दंड ठेवला पाहिजे. तसे यात दिसत नाही. पण तरी सरकारची बाजू ऐकून घेतल्यावर आम्ही भूमिका व्यक्त करू, असे जयंत पाटील म्हणाले. 

दरम्यान, समृद्धी महामार्गाचा वापर करणाऱ्या वाहनांना एकूण १८ टोलनाके पार करावे लागणार आहेत. या एकूण ५२० किलोमीटर मार्गासाठी हलक्या वाहनांसाठी ८९९ रुपयांपर्यंत टोल भरावा लागणार आहे. मुंबईपासून थेट नागपूरपर्यंत ७०१ किलोमीटरचा पूर्ण प्रवास करणाऱ्या चारचाकी गाड्यांना जवळपास १२०० रुपये टोल भरावा लागणार आहे.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: ncp leader jayant patil asked shinde fadnavis govt about samruddhi mahamarg toll price

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.