शरद पवार यांचे कार्यकर्ते शोभतात, माणुसकीचं नातं कसं जपावं हे निलेश लंके यांनी दाखवलं : जयंत पाटील

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2021 03:03 PM2021-05-23T15:03:41+5:302021-05-23T15:09:00+5:30

गेल्या अनेक दिवसांपासून निलेश लंके करत आहेत कोरोनाबाधितांची सेवा. जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केलं लंके यांचं कौतुक.

ncp leader jayant patil praises nilesh lanke covid 19 help sharad pawars party worker | शरद पवार यांचे कार्यकर्ते शोभतात, माणुसकीचं नातं कसं जपावं हे निलेश लंके यांनी दाखवलं : जयंत पाटील

शरद पवार यांचे कार्यकर्ते शोभतात, माणुसकीचं नातं कसं जपावं हे निलेश लंके यांनी दाखवलं : जयंत पाटील

googlenewsNext
ठळक मुद्देगेल्या अनेक दिवसांपासून निलेश लंके करत आहेत कोरोनाबाधितांची सेवा.जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केलं लंके यांचं कौतुक

"आमदार निलेश लंके यांनी संकटाच्या काळात दुःख वाटून घेतले आहे. माणुसकीचं नातं कसं जपावं हे त्यांनी दाखवले. शरद पवार यांचा कार्यकर्ता म्हणून ते शोभतात. जेव्हा जेव्हा संकट येतं तेव्हा शरद पवार सामान्यांसाठी धावून जातात त्याचप्रमाणे निलेश लंके काम करत आहेत," अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी कौतुक केले आहे. 

पारनेर तालुक्याच्या भावळणी येथे आमदार निलेश लंके यांनी शरदचंद्र आरोग्य मंदिर कोविड सेंटर उभारले आहे. त्या ठिकाणीच ते कोरोना रुग्णांची सेवा करत आहेत. त्यांच्या या कामाचे कौतुक करण्यासाठी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी या कोविड सेंटरला भेट दिली.

दोन दिवसांपूर्वी जलसंपदा विभागाच्या बैठकीदरम्यान आमदार निलेश लंके यांनी मंत्री जयंत पाटील यांना कोविड सेंटरला भेट देण्याची विनंती केली होती. आमदार निलेश लंके यांच्या विनंतीला मान देत जयंत पाटील पारनेरमध्ये दाखल झाल्याने आमदार निलेश लंके भावूक झाले होते.

लंकेंचा अभिमान वाटतो

"काही दिवसांपासून फक्त ऐकूनच होतो मात्र आज भेट दिल्याने आमदार निलेश लंके यांचा अभिमान वाटतो. सर्वांची सेवा करण्याचा 'पण' त्यांनी घेतला आहे. १४ एप्रिलपासून झोकून काम करत आहे, लोकांचा आदर्श म्हणून ते उभे राहिले आहे. त्यांनी महाराष्ट्राचे नाव उंचावले आहे. सामान्य माणसाची चांगली सेवा आमदार निलेश लंके यांच्या माध्यमातून होत आहे," असं म्हणत जयंत पाटील यांनी निलेश लंके यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली.

Web Title: ncp leader jayant patil praises nilesh lanke covid 19 help sharad pawars party worker

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.