"राज्यपाल म्हणाले होते, 'मुझे जाने का है', आता त्यांच्या विनंतीचा विचार करावा", जयंत पाटलांनी लगावला टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2023 05:57 PM2023-01-23T17:57:10+5:302023-01-23T17:57:35+5:30

केंद्र सरकारच्या काही प्रोसीजर बाबी असतील किंवा त्यांना नवीन राज्यपाल बदली करण्यासाठी माणूस मिळाला नसेल, असाही टोला जयंत पाटील यांनी लगावला.

ncp leader jayant patil reaction on maharashtra governor bhagat singh koshyari tells pm narendra modi he wants to quit | "राज्यपाल म्हणाले होते, 'मुझे जाने का है', आता त्यांच्या विनंतीचा विचार करावा", जयंत पाटलांनी लगावला टोला

"राज्यपाल म्हणाले होते, 'मुझे जाने का है', आता त्यांच्या विनंतीचा विचार करावा", जयंत पाटलांनी लगावला टोला

googlenewsNext

मुंबई : राज्यपाल यापूर्वी आम्हालाच सांगत होते मुझे जाने का है, आता लेखी विनंती केली आहे, तर केंद्र सरकार लेखी निवेदनातील विनंतीचा विचार करेल, असे स्पष्ट मत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केले आहे.

गेल्या काही दिवसापासून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी वेगवेगळ्या वक्तव्यांमुळे वादात सापडले आहेत. त्यामुळे कोश्यारी यांनी राज्यपालपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी विरोधी पक्षांनी केली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे राज्यपाल पदाचा राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त केली आहे. यावर जयंत पाटील यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. मधल्या काळात राज्यपालांनी जी वक्तव्ये केली, ती बघता महाराष्ट्रातील राजकीय पक्षांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. आता राज्यपालांनीच इच्छा व्यक्त केली आहे. केंद्र सरकारच्या काही प्रोसीजर बाबी असतील किंवा त्यांना नवीन राज्यपाल बदली करण्यासाठी माणूस मिळाला नसेल, असाही टोला जयंत पाटील यांनी लगावला.

दरम्यान, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे राज्यपाल पदाचा राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त केली आहे. राजकीय जबाबदारीतून मुक्त होऊन जीवनाचा उर्वरित काळ चिंतन, मननात घालविण्याचा मानस पंतप्रधानांना कळविल्याची माहिती त्यांनी दिली. नुकत्याच झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई भेटीत आपण राजकीय जबाबदारीतून मुक्त होऊन जीवनातील उर्वरित  काळ अध्ययन, मनन व चिंतनात व्यतीत करु इच्छितो अशी इच्छा त्यांच्याकडे व्यक्त केली असल्याची माहिती राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज येथे दिली.  या संदर्भात राजभवनाने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकातून राज्यपाल कोश्यारी यांनी ही माहिती दिली आहे. 

Web Title: ncp leader jayant patil reaction on maharashtra governor bhagat singh koshyari tells pm narendra modi he wants to quit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.