थेट राज्यपालांचा निषेध, ‘त्या’ घटनेवरुन जितेंद्र आव्हाडांनी केले CM स्टॅलिन यांचं कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2023 05:59 PM2023-01-10T17:59:05+5:302023-01-10T17:59:44+5:30

'मुख्यमंत्री Mk स्टॅलिन यांना माझा सलाम आहे.'

NCP leader Jitendra Awhad praises Tamilnadu Cm MK Stalin, for opposing Tamilnadu Governor | थेट राज्यपालांचा निषेध, ‘त्या’ घटनेवरुन जितेंद्र आव्हाडांनी केले CM स्टॅलिन यांचं कौतुक

थेट राज्यपालांचा निषेध, ‘त्या’ घटनेवरुन जितेंद्र आव्हाडांनी केले CM स्टॅलिन यांचं कौतुक

googlenewsNext


मुंबई- तामिळनाडूच्या (Tamilnadu) विधानसभेत सोमवारी गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. सत्ताधाऱ्यांकडून दिलेल्या भाषणातील काही भाग वगळून राज्यपालांनी अभिभाषणाचे वाचन केल्यामुळे सत्ताधारी द्रमुक ( DMK) पक्षाने नाराजी व्यक्त केली. मुख्यमंत्री स्टॅलिन (MK Stalin) यांनीही तात्काळ राज्यपालांचा निषेध व्यक्त केला. यामुळे राज्यपाल आर.एन.रवी (Governor RN Ravi) सभागृहाबाहेर पडले. यानंतर राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी स्टॅलिन यांचं कौतुक केलं.

स्टॅलिन यांचा अभिमान
पत्रकार परिषदेत आव्हाड म्हणाले, 'तामिळनाडू विधानसभेत राज्यपालांनी कॅबिनेटने लिहून दिलेल्या भाषणामधून काही गोष्टी गाळल्या. तामिळनाडूत ज्यांना देव मानतात, अशा पेरियार रामास्वामी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं नाव राज्यपालांनी मुद्दामहून टाळलं. यानंतर मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी जागच्या जागी राज्यपालांचा निषेध केला. याचा राग आल्याने राज्यपाल अधिवेशन सोडून निघून गेले, याचा मला अभिमान आहे,' असं आव्हाड म्हणाले.

महापुरुषांचा अपमान
आव्हाड पुढे म्हणाले, 'महापुरुषांचा अपमान सहन न करणं, ही भारताची परंपरा आहे. तामिळनाडूत पेरियार रामास्वामी यांना देवासमान मानलं जातं. त्या पेरियार यांचा अपमान झालाय, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान झाला. यावेळी मुख्यमंत्री स्टॅलिन ताठ मानेनं उभे राहतात आणि राज्यपालांचा निषेध करतात. यानंतर राज्यपाल अधिवेशनातून निघून जातात, पण स्टॅलिन राज्यपालांना अडवण्याचा एकदाही प्रयत्न कत नाहीत. मुख्यमंत्री स्टॅलिन यांना माझा सलाम आहे,' असंही आव्हाड म्हणाले.

Web Title: NCP leader Jitendra Awhad praises Tamilnadu Cm MK Stalin, for opposing Tamilnadu Governor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.