आजपासूनच भाजपसमोर एक आव्हान म्हणून उभे राहणार, राष्ट्रवादी काँग्रेसचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2022 03:15 PM2022-06-30T15:15:04+5:302022-06-30T15:15:04+5:30

राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी घेतली शरद पवार यांची भेट.

ncp leader mahesh tapase targets bjp over maharashtra political crisis shiv sena uddhav thackeray | आजपासूनच भाजपसमोर एक आव्हान म्हणून उभे राहणार, राष्ट्रवादी काँग्रेसचा इशारा

आजपासूनच भाजपसमोर एक आव्हान म्हणून उभे राहणार, राष्ट्रवादी काँग्रेसचा इशारा

googlenewsNext

“शिवसेनेत बंड घडवून महाविकास आघाडी सरकार पाडण्याचे पाप भाजपने केले हे महाविकास आघाडीचे नेते, कार्यकर्ते, व पदाधिकारी कधीच विसरणार नाही. आजपासूनच राष्ट्रवादी काँग्रेस भाजपसमोर एक आव्हान म्हणून उभी राहणार आहे,” असा स्पष्ट इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी दिला आहे. आज राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांनी भेट घेतली. त्यानंतर या भेटीबाबत महेश तपासे यांनी यावर भाष्य केलं. 

भाजपची सत्ता येताच राष्ट्रवादी काँग्रेस एक सक्षम विरोधी पक्ष म्हणून काम करताना पहायला मिळेल असा विश्वासही महेश तपासे यांनी यावेळी व्यक्त केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व आमदार मुंबईत असल्याने त्यांनी आज शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी मविआ सरकार पाडण्यासाठी झालेल्या घडामोडी आणि येत्या काळात कशापद्धतीने भाजप विरोधात लढा द्यायचा याचे सविस्तर मार्गदर्शन केले. 

अडीच वर्ष महाविकास आघाडीचे सरकार होते. या सरकारला शरद पवार यांनी योग्य मार्गदर्शन केले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निधीचे वाटप समान करताना राज्याची आर्थिक घडी विस्कटणार नाही याची काळजी घेतल्याचेही तपासे म्हणाले. शिवसेनेत जी बंडाळी झाली त्याला खतपाणी भाजपने घातले हे सर्व महाराष्ट्र पहात आहे. आजपासूनच राष्ट्रवादी काँग्रेस आपल्या शिलेदारांसह पुन्हा मैदानात उतरली असून येणाऱ्या निवडणुकीत भाजपविरोधात मविआचेच उमेदवार निवडून आणण्याचा चंग नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी व पदाधिकार्‍यांनी बांधला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले

Read in English

Web Title: ncp leader mahesh tapase targets bjp over maharashtra political crisis shiv sena uddhav thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.