‘भाई’ युनिव्हर्सिटीमध्ये मी गेलेलो नाही!; छगन भुजबळ यांनी लगावला टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2021 07:43 AM2021-09-30T07:43:58+5:302021-09-30T07:44:29+5:30

कांदे यांनी केलेले खोटे आरोप मला राजकारणात बदनाम करण्याचा कुटिल डाव असल्याचं भुजबळ यांचं वक्तव्य.

ncp leader minister chhagan bhujbal speaks on shiv sena leader kande allegation pdc | ‘भाई’ युनिव्हर्सिटीमध्ये मी गेलेलो नाही!; छगन भुजबळ यांनी लगावला टोला

‘भाई’ युनिव्हर्सिटीमध्ये मी गेलेलो नाही!; छगन भुजबळ यांनी लगावला टोला

googlenewsNext
ठळक मुद्देकांदे यांनी केलेले खोटे आरोप मला राजकारणात बदनाम करण्याचा कुटिल डाव असल्याचं भुजबळ यांचं वक्तव्य.

शिवसेना आमदाराची खोट्या आरोपांची तक्रार
नाशिक : राजकारणात ‘मीडिया व्हॅल्यू’ मिळविण्यासाठी ‘भुजबळ’ नावाचा वापर केला गेला. कांदे यांनी केलेले खोटे आरोप मला राजकारणात बदनाम करण्याचा कुटिल डाव असून, त्याची तक्रार मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली असून, चौकशीची मागणीही केली आहे. मी कधीही ‘भाई’ युनिव्हर्सिटीमध्ये गेलेलो नाही, असा टोलाही राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी लगावला. 

ते म्हणाले, पोलिसांनी तपास करीत फोन कॉलचे रेकाॅर्डिंग तपासावे. यामध्ये आमचा काहीही संबंध नाही. ‘भाई’ युनिव्हर्सिटीचे जे विद्यार्थी आहेत, त्यांच्यात काय चर्चा होते, हे मी सांगू शकत नाही, असा चिमटाही भुजबळ यांनी त्यांच्या खास शैलीत काढला. 

भुजबळ म्हणाले, ज्या अशोक निकाळजे नावाचा कांदे यांनी तक्रार अर्जात उल्लेख केला आहे, त्यांनीच भुजबळ यांच्याशी आमची काहीही चर्चा झाली नसल्याचे सांगितल्याने प्रश्न मिटतो. उलट कांदे यांनीच ‘मी आमदार आहे, तुला शिकवितो असा दम दिला’ असा आरोपही निकाळजे यांनी केला आहे. 

५० वर्षांची तपश्चर्या पुरासारखी वाहून जाते 
राजकारणात मला ५० वर्षे झाली. ही मोठी तपश्चर्या असून, अशा प्रकारच्या घाणेरड्या आणि खोट्या आरोपांमुळे ही तपश्चर्या पुराच्या पाण्यासारखी वाहून जाते असे वाटते;  मात्र हे आरोप करणाऱ्यांच्या लक्षात येणार नाही, असेही भुजबळ यांनी बोलून दाखविले.

Web Title: ncp leader minister chhagan bhujbal speaks on shiv sena leader kande allegation pdc

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.