'बात निकलेगी तो दूर तलक जाएगी'; नवाब मलिकांचा समीर वानखेडंवर अप्रत्यक्ष निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2021 11:35 AM2021-11-03T11:35:08+5:302021-11-03T11:35:17+5:30

मागील अनेक दिवसांपासून नवाब मलिक ट्विटरवरुन वानखेडंवर टीका करत आहेत. आता आजही त्यांनी ट्विटरवरुन वानखेडंवर निशाणा साधला आहे.

NCP leader Nawab Malik new tweet on NCB officer Sameer Wankhede | 'बात निकलेगी तो दूर तलक जाएगी'; नवाब मलिकांचा समीर वानखेडंवर अप्रत्यक्ष निशाणा

'बात निकलेगी तो दूर तलक जाएगी'; नवाब मलिकांचा समीर वानखेडंवर अप्रत्यक्ष निशाणा

Next

मुंबई: मागील काही दिवसांपासून मुंबई क्रुज पार्टी प्रकरणाचा तपास करणारे एनसीबी(NCB)चे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे(Sameer Wankhede) आणि महाराष्ट्रातील अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक(Nawab Malik)यांच्यात आरोप-प्रत्यारोपांचे सत्र सुरू आहे. नवाब मलिक यांनी वानखेडेंवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. तसेच, दररोज मलिक ट्विटरवरुन वानखेडेंवर निशाणा साधत असतात. अशाच प्रकारचे एक ट्विट आजही मलिक यांनी केले आहे.

नवाब मलिकांकडून समीर वानखेडेंवर सातत्याने आरोप सुरू आहेत. समीर वानखेडे या विभागात आल्यापासून त्यांनी खासगी फौज आणली असून त्यात मनीष भानुशाली, सॅम डिसोझा यांच्यासह अनेक जण आहेत. ते ड्रग्जचा व्यवसायही करतात आणि लोकांना जाळ्यात अडकवतात, असे त्यांनी मंगळवारी म्हटले होते. तसेच, वानखेडे यांच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची वसुली करण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला. 

काय आहे नवाब मलिकांच्या ट्विटमध्ये ?
आता आजही नवाब मलिक यांनी ट्विटरवरुन वानखेडंवर नाव न घेता निशाणा साधला आहे. 'बात निकलेगी तो फिर दूर तलक जाएगी, लोग बेवजह उदासी का सबब पूछेंगे,'असे सूचक ट्विट मलिकांनी केले आहे. त्यांच्या या ट्विटवर यूजर्स जोरदार कमेंट करत आहेत. यात काहीजण मलिकांची बाजु घेत आहेत, तर काहीजण त्यांनाच ट्रोल करताना दिसत आहे. दरम्यान, या सूचक ट्विटवरुन मलिक नवा खुलासा करणार, असाही एक अंदाज लावला जात आहे. 

वानखेडेंचे खासगी सैन्य...
याआधीही नवाब मलिक यांनी वानखेडे यांचे व्हॉट्सअॅप चॅट आणि एक अनोळखी फोन नंबर शेअर केला होता. या चॅटवरून असे दिसते की, वानखेडेनेंनी त्यांच्या बहिणीचे बिझनेस कार्ड आणि ऑफिसचे लोकेशन शेअर केले होते. मलिक यांनी आरोप केला की, "समीर वानखेडे या विभागात आल्यापासून त्यांनी एक खासगी सैन्य आणले आहे, ज्यामध्ये मनीष भानुशाली, सॅम डिसूझा यांच्यासह अनेक लोक आहेत. ते ड्रग्जचा व्यवसायही करतात, लोकांनाही अडकवतात. वानखेडे यांच्या माध्यमातून कोट्य़वधी रुपयांची वसुली झाल्याचा आरोपही मलिकांनी केला आहे. 

वानखेडे लाखो रुपयांचे कपडे वापरतात
नवाब मलिक पुढे म्हणाले की, वानखेडे आल्यानंतर सारा अली खान, श्रद्धा कपूर, दीपिका पदुकोण यांना बोलावण्यात आले होते, परंतु आजपर्यंत आरोपपत्र दाखल करण्यात आले नाही, असे का? या प्रकरणातून हजारो कोटींची वसुली करण्यात आली आहे. आम्ही म्हणालो की दुबई आणि मालदीवमधून वसुली झाली, तुम्ही म्हणालात की मी दुबईला गेलो नाही, बहिण गेली. मालदीवमध्ये जाण्यासाठी खर्च येतो, तो कुठून खर्च झाला याची चौकशी व्हायला हवी. वानखेडे 5 ते 10 कोटींचे कपडे घालतात. 2 लाखाचे बूट घालणारी व्यक्ती प्रामाणिक आहे का? हातातील घड्याळ 20 लाखांचे आहे. एखाद्या प्रामाणिक अधिकाऱ्याचे जीवनमान असेल असूच शकत नाही, असंही मलिक म्हणाले होते.
 

 

 

Web Title: NCP leader Nawab Malik new tweet on NCB officer Sameer Wankhede

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.