“ त्या कायद्यात वेळ निश्चित नसल्याने त्याचा फायदा घेऊन राज्यपालांनी आमदारांच्या नियुक्तीचा निर्णय अनिर्णित ठेवला” 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2021 01:11 PM2021-05-22T13:11:08+5:302021-05-22T13:15:36+5:30

नवाब मलिक यांची टीका. आता न्यायालयानं विचारल्यानंतर त्यावर निर्णय राज्यपाल घेतील, मलिक यांचं वक्तव्य 

ncp leader nawab malik slams bhagatsingh koshyari over mahavikas aghadhi mla decision vidhan parishad | “ त्या कायद्यात वेळ निश्चित नसल्याने त्याचा फायदा घेऊन राज्यपालांनी आमदारांच्या नियुक्तीचा निर्णय अनिर्णित ठेवला” 

“ त्या कायद्यात वेळ निश्चित नसल्याने त्याचा फायदा घेऊन राज्यपालांनी आमदारांच्या नियुक्तीचा निर्णय अनिर्णित ठेवला” 

Next
ठळक मुद्देआता न्यायालयानं विचारल्यानंतर त्यावर निर्णय राज्यपाल घेतील, मलिक यांचं वक्तव्य जनहित याचिकेवर कोर्टाने विचारल्यानंतर त्यावर निर्णय राज्यपाल घेतील, मलिक यांनी व्यक्त केला विश्वास

'त्या' कायद्यात वेळ निश्चित नसल्याने त्याचा फायदा घेऊन राज्यपालांनी विधानपरिषदेच्या १२ आमदारांच्या नियुक्तीचा निर्णय अनिर्णित ठेवला असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी व्यक्त केले आहे. 

न्यायमूर्ती शाहरूख काथावाला आणि न्यायमूर्ती सुरेंद्र तावडे यांच्या खंडपीठानं याचिकाकर्त्यांना थेट राज्यपालांच्या सचिवांना या याचिकेत प्रतिवादी करण्याचे निर्देश देत सर्व प्रतिवाद्यांना प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. तसंच यासंदर्भातील सुनावणी ९ जूनपर्यंत तहकूब केली आहे. या घडामोडींवर मंत्री नवाब मलिक यांनी भाष्य केले आहे.
दरम्यान जनहित याचिकेवर न्यायालयानं विचारल्यानंतर त्यावर निर्णय राज्यपाल घेतील व न्यायालयाला कळवतील असा विश्वासही नवाब मलिक यांनी व्यक्त केला आहे.

“विधानपरिषदेवर १२ आमदारांच्या नियुक्तीबाबत राज्य मंत्रिमंडळानं राज्यपालांकडे शिफारस केली होती. या घटनेला सात महिने होत आले तरी निर्णय घेतलेला नाही. मात्र जनहित याचिकेवर सुनावणी करताना कोर्टाने ही फाईल ड्रॉवरमध्ये ठेवण्यासाठी आहे की निर्णय घेण्यासाठी अशी विचारणा केली आहे. त्यामुळे आता राज्यपाल काय निर्णय घेणार याची वाट पहावी लागणार आहे,” असं नवाब मलिक यांनी सांगितले.

Web Title: ncp leader nawab malik slams bhagatsingh koshyari over mahavikas aghadhi mla decision vidhan parishad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.