Tauktae Cyclone : “फडणवीस यांनी केंद्राकडून अधिक मदत मिळण्यासाठी आग्रह धरला पाहिजे, ही त्यांची जबाबदारी”

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2021 01:56 PM2021-05-22T13:56:31+5:302021-05-22T13:58:33+5:30

फडणवीसांनी तसं केलं तर ते राज्यातील जनतेसोबत आहेत हे सिद्ध होईल. कोकणातील जनतेला राज्य सरकार मदत करणारच मलिक यांचं वक्तव्य 

ncp leader nawab malik slams former cm devendra fadnavis tauktae cyclone konkan help modi government | Tauktae Cyclone : “फडणवीस यांनी केंद्राकडून अधिक मदत मिळण्यासाठी आग्रह धरला पाहिजे, ही त्यांची जबाबदारी”

Tauktae Cyclone : “फडणवीस यांनी केंद्राकडून अधिक मदत मिळण्यासाठी आग्रह धरला पाहिजे, ही त्यांची जबाबदारी”

googlenewsNext
ठळक मुद्देफडणवीसांनी तसं केलं तर ते राज्यातील जनतेसोबत आहेत हे सिद्ध होईल, मलिक यांचं वक्तव्य कोकणातील जनतेला राज्य सरकार मदत करणारच : नवाब मलिक

“कोकणातील जनतेला भरपाई देणार आहोतच परंतु महाराष्ट्राला जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी मोदींकडे आग्रह धरला पाहिजे. त्यांनी तसे केले तर ते राज्यातील जनतेसोबत आहेत हे सिद्ध होईल. मात्र देवेंद्र फडणवीसमहाराष्ट्रासोबत नाहीत हे आता सिद्ध होऊ लागले आहे,” अशी जोरदार टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केली आहे.
 
“विरोधी पक्ष वैफल्यग्रस्त मानसिकतेतून टीका करत आहेत हे काल मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. राज्यसरकारची यंत्रणा, प्रशासन अंदाज घेत आहे. पंचनामे करत आहे. पालकमंत्री सातत्याने संपर्कात आहेत. मुख्यमंत्र्यांनी काही भागाचा दौरा केल्यानंतर त्याचा अंदाज पंचनाम्याच्या माध्यमातून येईल. त्यानंतर निश्चितरुपाने एनडीआरएफ, एसडीआरएफच्या स्टँडींग ऑर्डरपेक्षा त्याव्यतिरिक्त अतिरिक्त मदत देण्याची राज्यसरकारची भूमिका असेल,” असेही नवाब मलिक यांनी स्पष्ट केले. 
देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रसरकारकडून जास्तीत जास्त मदत मिळण्यासाठी आग्रह धरला पाहिजे ही त्यांची जबाबदारी आहे. मात्र आग्रह धरत नाही आणि राज्य सरकार काय देणार यावर देवेंद्र फडणवीस बोलत आहेत असा टोलाही त्यांनी लगावला. 

“पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात आले नाहीत. मात्र गुजरातला एक हजार कोटीचे पॅकेज दिले. आता जनता प्रश्न निर्माण करु लागल्यावर आमच्यावर प्रश्न निर्माण केला जात आहे. आम्ही भरपाई देणारच आहोत पण आधी देवेंद्र फडणवीस यांनी मोदींकडे आग्रह धरला पाहिजे. महाराष्ट्राला जास्त मदत मिळवून दिली पाहिजे,” असा सल्लाही नवाब मलिक यांनी दिला आहे. दरम्यान देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रासोबत आहेत की, भाजप नेत्यांना वाचवायला लागले आहेत हे त्यांनी सांगावं असंही नवाब मलिक म्हणाले.
 

Web Title: ncp leader nawab malik slams former cm devendra fadnavis tauktae cyclone konkan help modi government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.