भीमशक्ती अन् शिवशक्ती एकत्र येणे हे एक महत्त्वाचे पाऊल; राजेश टोपे यांचं मत
By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2022 05:38 PM2022-12-05T17:38:38+5:302022-12-05T17:40:05+5:30
महाविकास आघाडी घट्ट व्हावी, यासाठी राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेस एकत्र चर्चा देखील करतील, असं राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं.
आज शिवसेना पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व वंचित बहुजन आघाडीची युती झाल्यानंतर नवीन राजकीय समीकरणाला सुरुवात झाली आहे. यावर अमरावती येथील पत्रकार परिषदेमध्ये राष्ट्रवादीचे नेते व माजी मंत्री राजेश टोपे यांनी या युतीवर महत्त्वाचं विधान केलं आहे.
महाविकास आघाडी सशक्त होण्याच्या दृष्टिकोनातून भिमशक्ती आणि शिवशक्ती एकत्र येणे हे एक महत्त्वाचे पाऊल आहे. प्रकाश आंबेडकर सोबत येत असतील तर आनंदाची गोष्ट आहे. प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीत घटक पक्ष म्हणून यावं व आणखी महाविकास आघाडी घट्ट व्हावी, यासाठी राष्ट्रवादी शिवसेना काँग्रेस एकत्र चर्चा देखील करतील, असं राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं.
सर्व धर्मनिरपेक्ष पक्षांनी एकत्र यावं, असं आवाहन देखील राजेश टोपे यांनी यावेळी केलं. वंचित व शिवसेनेची युती झाल्यानंतर उद्धव ठाकरे महाविकास आघाडीचे नेत्यांची चर्चा करून अधिकृतरित्या महाविकास आघाडी या निमित्ताने घट्ट करतील, अशी अपेक्षा राजेश टोपे यांनी व्यक्त केली.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"