Rohit Pawar Meets Eknath Shinde : रोहित पवार यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, चर्चांना उधाण
By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2022 08:03 AM2022-07-28T08:03:11+5:302022-07-28T08:03:58+5:30
काही दिवसांपूर्वी एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. त्यानंतर आता रोहित पवारांनी त्यांची भेट घेतली.
महाराष्ट्रात रंगलेल्या राजकीय नाट्यानंतर राज्यात एकनाथ शिंदे आणि देंवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झालं. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची आणि देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमत्रिपदाची शपथ घेतली. एकनाथ शिंदे यांच्यानंतर शिवसेनेच्या काही आमदारांनी बंडखोरी केली आणि एकनाथ शिंदे यांची साथ दिली. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचा आणि आपल्या विधान परिषदेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. दरम्यान, आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार रोहित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली.
रोहित पवार यांनी बुधवारी मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. त्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून त्यांच्या भेटीचे फोटोही शेअर केले आहे. मतदारसंघासह विविध मुद्द्यांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुंबईत भेट घेतल्याचं रोहित पवार यांनी म्हटलंय.
मतदारसंघासह विविध विषयांवर मा. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांची आज मुंबईत भेट घेऊन चर्चा केली.@mieknathshindepic.twitter.com/5hdq81L4hx
— Rohit Pawar (@RRPSpeaks) July 27, 2022
यापूर्वी एका कार्यक्रमात रोहित पवार यांनी येत्या तीन महिन्यांत मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीनंतर विधानसभेच्या मध्यवर्ती निवडणुका लागण्याची शक्यता असल्याने कार्यकर्त्यांनी कामाला लागावे. २०२४ ला आपल्या विचारांचे सरकार आणायचे आहे, असे म्हटले होते.