Coronavirus : रोहित पवार म्हणाले, "राज्यातील निर्बंधांचा अनेकांना त्रास होऊ शकतो, पण..."

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2021 12:20 PM2021-04-15T12:20:29+5:302021-04-15T12:22:24+5:30

Maharashtra Break The Chain : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात लागू करण्यात आले आहेत निर्बंघ

ncp leader rohit pawar speaks on maharashtra corona virus strict restritions curfew | Coronavirus : रोहित पवार म्हणाले, "राज्यातील निर्बंधांचा अनेकांना त्रास होऊ शकतो, पण..."

Coronavirus : रोहित पवार म्हणाले, "राज्यातील निर्बंधांचा अनेकांना त्रास होऊ शकतो, पण..."

Next
ठळक मुद्देकोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात लागू करण्यात आले आहेत निर्बंधनियमांचं पालन करण्याचं पोलीस महासंचालकांचं आवाहन

‘ब्रेक दि चेन’मधील निर्बंधांची अंमलबजावणी बुधवारी रात्री ८ वाजेपासून राज्यभरात सुरू झाली. संचारबंदीचं पालन योग्यरीतीनं व्हावं यासाठी राज्यात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करा, असे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी दिले. कोणत्याही परिस्थितीत गाफिल राहून चालणार नाही आणि संसर्ग आणखी फैलावलेला परवडणार नाही, असंही ते म्हणाले होते. दरम्यान, राज्यात लागू करण्यात आलेल्या निर्बंधांमुळे अनेकांनी नाराजी व्यक्त केली. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार रोहित पवार यांनीदेखील आपलं मत व्यक्त करत नागरिकांना सहकार्याचं आवाहन केलं आहे. 

""राज्यातील निर्बंधांचा अनेकांना त्रास होऊ शकतो, पण आज प्रत्येकाचा जीव महत्त्वाचा असल्यानं नाईलाजानं हा निर्णय घेतला आहे. अन्य राज्यांतही असाच निर्णय घेतला जाईल, अशी स्थिती आहे हे ध्यानात घ्यावं. या काळात एकमेकांना सहकार्य करुयात, कोरोना विषाणूची साखळी तोडूयात," असं आवाहन रोहित पवार यांनी केलं आहे. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया दिली.



गोंधळ नको

"विवाह समारंभ हे कोरोना संसर्गास मोठ्या प्रमाणावर जबाबदार असल्याचे लक्षात आले आहे. त्यादृष्टीने यावेळेस सर्व नियम व्यवस्थित पाळले जात आहेत किंवा नाहीत हे जिल्हा व पोलीस प्रशासनाने पाहावे. अंमलबजावणी करताना मनात गोंधळ ठेवू नका, स्पष्टता ठेवा," असंही मुख्यमंत्री म्हणाले.   

अफवावर सायबर पोलिसांचा वॉच

या काळात अफवा पसरू नये म्हणून सायबर पोलीस सोशल हालचालीवर लक्ष ठेवून आहेत तसेच कोणीही अफवा पसरवू नये, असं आवाहनही पोलिसांनी केलं आहे.

नियमांचे पालन करा - पोलीस महासंचालक 

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊनच्या काळात राज्यातील नागरिकांनी आवश्यकतेशिवाय घराबाहेर पडू नये, नियमांचे पालन करून प्रशासन व पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी बुधवारी केलं. संचारबंदीच्या या काळात दोन लाखांहून अधिक पोलीस दोन शिफ्टमध्ये कार्यरत असतील. त्यांच्या मदतीला सुमारे १४ हजार होमगार्ड आणि राज्य राखीव दलाच्या २० तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. तसंच कोरोना रुग्णांना सहाय्य करण्यासाठी पोलिसांना सूचना करण्यात आल्या आहेत.  

Web Title: ncp leader rohit pawar speaks on maharashtra corona virus strict restritions curfew

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.