Rohit Pawar “खालच्या पातळीवर जाऊन गरळ ओकणाऱ्या काही अघोषित प्रवक्त्यांना भाजपने आतातरी वेसण घालावी”
By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2022 05:37 PM2022-06-06T17:37:30+5:302022-06-06T17:56:59+5:30
Leader Rohit Pawar targets BJP over Prophet Muhammad comment spoke person Saudi Arabia Qatar राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार यांचं वक्तव्य. अरब देशातील कचराकुंडीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो लावण्यात आल्याने नवा वाद निर्माण झाला आहे.
मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केल्यामुळे अरबी देशातील कतार आणि कुवेतने तेथील भारतीय दुतावासाला माहिती दिली. तसंच, या वक्तव्याविरोधात निषेधही व्यक्त केला आहे. कतारच्या परराष्ट्रमंत्रालयाने दोहा येथे भारतीय राजदूत दिपक मित्तल यांना याबाबत माहिती दिली. एकीकडे हा वाद सुरू असताना आता अरब देशातील कचराकुंडीवर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो लावण्यात आल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. दरम्यान, यावरून आता भारतातूनही प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.
“राजकीय विरोधक असले तरी नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान आहेत. त्यांचा फोटो वाईट पद्धतीने पाहण्याची वेळ भाजपच्या मोकाट प्रवक्त्यांनी आणलीय. तसंच आखातातील भारतीयांची अडचण होत असून भारतीय मालावर बहिष्कार टाकला जातोय. हा देशाचा अवमान असून यामुळं प्रत्येक भारतीय संतप्त आहे,” असं रोहित पवार Leader Rohit Pawar म्हणाले. या प्रकरणी त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया दिली.
विशेष म्हणजे राज्यातही असे अनेक बेताल लोक आहेत.. किंबहुना त्यांच्या या 'लाय...'मुळंच @BJP4Maharashtra ने त्यांची भरती केलीय. देशाची मान खाली घालायला लावणाऱ्या या घोषित आणि खालच्या पातळीवर जाऊन गरळ ओकणाऱ्या काही अघोषित प्रवक्त्यांना भाजपने आतातरी वेसण घालावी.
— Rohit Pawar (@RRPSpeaks) June 6, 2022
“विशेष म्हणजे राज्यातही असे अनेक बेताल लोक आहेत.. किंबहुना त्यांच्या या 'लाय...'मुळंच भाजपने त्यांची भरती केलीय. देशाची मान खाली घालायला लावणाऱ्या या घोषित आणि खालच्या पातळीवर जाऊन गरळ ओकणाऱ्या काही अघोषित प्रवक्त्यांना भाजपने आतातरी वेसण घालावी,” असंही ते म्हणाले.