‘गब्बर होतायेत शेजारी, महाराष्ट्र पडतोय आजारी,’ PhonePe च्या निर्णयानंतर रोहित पवारांचा निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2022 08:28 AM2022-09-23T08:28:10+5:302022-09-23T08:28:37+5:30

वेदांता फॉक्सकॉननंतर आता फोन पे नं आपलं कार्यालय महाराष्ट्राबाहेर हलवण्याचा निर्णय घेतलाय.

ncp leader rohit pawar targets eknath shinde government over phone pe exits from maharashtra to karnataka | ‘गब्बर होतायेत शेजारी, महाराष्ट्र पडतोय आजारी,’ PhonePe च्या निर्णयानंतर रोहित पवारांचा निशाणा

‘गब्बर होतायेत शेजारी, महाराष्ट्र पडतोय आजारी,’ PhonePe च्या निर्णयानंतर रोहित पवारांचा निशाणा

googlenewsNext

महाराष्ट्रात येणारा वेदांता फॉक्सकॉन हा प्रकल्प गुजरातमध्ये गेला यावरून राज्यात सध्या मोठ्या प्रमाणात राजकारण सुरू आहे. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीही सुरू आहेत. अशातच आता आणखी धक्कादायक वृत्त समोर आलं आहे. आता PhonePe या दिग्गज कंपनीनं महाराष्ट्राबाहेर पडण्याचा निर्णय घेतलाय. आपलं मुंबईतील कार्यालय कर्नाटकमध्ये स्थलांतरीत करण्यात येणार असल्याची माहिती कंपनीनं एका जाहिरातीद्वारे दिली आहे. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.

‘फोन पे डेबिटेड फ्रॉम महाराष्ट्र, क्रेडिटेड टू कर्नाटक. वेदांतानंतर #PhonePe ची बारी. गब्बर होतायेत शेजारी, महाराष्ट्र पडतोय आजारी, वा रे सत्ताधारी. टॅक्समध्ये महाराष्ट्र करतो सर्वाधिक पे, महाराष्ट्राच्या युवांना मात्र बेरोजगारीचा वे,’ असं म्हणत रोहित पवारांनी सरकारवर निशाणा साधला. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून टीकेचा बाण सोडला.


कायआहेप्रकरण?
फोन पे नं एका वृत्तपत्रात दिलेल्या सार्वजनिक नोटीसमध्ये आपलं मुंबईतील कार्यालय कर्नाटकात स्थलांतरीत करण्यात येणार असल्याचं म्हटलंय. काही दिवसांपूर्वीच वेदांता-फॉक्सकॉननं आपला प्रकल्प गुजरातमध्ये सुरू करण्याची घोषणा केली होती. परंतु यापूर्वी तो महाराष्ट्रात येणार असल्याचं म्हटलं जात होतं. दरम्यान, या प्रकल्पामुळे दीड लाखांपेक्षा अधिक रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार होत्या. परंतु कंपनीनं गुजरातची निवड केली.

कायम्हटलंफोनपेनं?
“कंपनीचे नोंदणीकृत कार्यालयल महाराष्ट्र राज्यातून कर्नाटक राज्यात बदलण्यासाठी कंपनी कायदा २०१२ च्या कलम १३ अंतर्गत केंद्र सरकारकडे अर्ज करण्यात आलसा आहे. ज्यासाठी कंपनी मेमोरँडम ऑफ असोसिएशनमध्ये फेरफार करण्यासंदर्भात १६ ऑगस्ट २०२२ रोजी घेण्यात आलेल्या आमसभेत ठराव मंजूर करण्यात आला आहे,” असं कंपनीनं दिलेल्या नोटीसीमध्ये म्हटलं आहे.

Web Title: ncp leader rohit pawar targets eknath shinde government over phone pe exits from maharashtra to karnataka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.