भाजपाला 'धक्के पे धक्का'...!; शरद पवारांनी 'या' पक्षाचे आभार मानत केले अभिनंदन!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2020 08:09 PM2020-09-28T20:09:59+5:302020-09-28T20:13:44+5:30

अकाली दलाच्या एनडीएतून बाहेर पडण्याच्या निर्णयाचे अनेक पक्षांनी स्वागत केले आहे. यासंदर्भात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही ट्विट केले आहे.

NCP leader sharad pawar congratulates akali dal for quitting bjp led NDA | भाजपाला 'धक्के पे धक्का'...!; शरद पवारांनी 'या' पक्षाचे आभार मानत केले अभिनंदन!

भाजपाला 'धक्के पे धक्का'...!; शरद पवारांनी 'या' पक्षाचे आभार मानत केले अभिनंदन!

Next
ठळक मुद्देअकाली दल भाजपाची साथ सोडून भाजपा प्रणित एनडीएतून बाहेर पडल्याबद्दल पवारांनी ट्विट करत त्यांचे अभिनंद केले आहे.अकाली दलाने केंद्राच्या कृषी विधेयकाला विरोध दर्शवला असून एनडीएतून बाहेर पडला आहे.शिवसेना नेते संजय राऊत यांनीही एक ट्विट करत अकाली दलाचे कौतुक केले आहे. 

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी भाजपाचा कालपर्यंत मित्र पक्ष असलेल्या अकाली दलाचे जाहीर अभिनंदन केले आहे. कृषी विधेयकाच्या मुद्द्यावरून अकाली दल भाजपाची साथ सोडून भाजपा प्रणित एनडीएतून बाहेर पडल्याबद्दल पवारांनी ट्विट करत त्यांचे अभिनंद केले आहे. केवळ पवारांनीच नाही, तर शिवसेना नेते संजय राऊत यांनीही एक ट्विट करत अकाली दलाचे कौतुक केले आहे. 

एनडीएची (राष्ट्रीय लोकशाही आघाडी) स्थापन झाल्यापासूनच अकाली दल आणि शिवसेना हे दोन महत्वाचे पक्ष भाजपासोबत होते. अकालीदल एनडीएतून बाहेर पडण्यापूर्वी, म्हणजेच साधारणपणे 10 महिन्यांपूर्वी, महाराष्ट्रात शिवसेनेने भाजपाला दणका दिला. एवढेच नाही, तर सेनेने केंद्रातही भाजपाची साथ सोडली आणि ते एनडीएतून वेगळे झाले. यानंतर भाजपाला अकाली दलाच्या रुपात बसलेला हा दुसरा धक्का आहे. 

उमा भारती AIIMS मध्ये, बाबरी मशीद प्रकरणाच्या सुनावणीसाठी उपस्थित राहण्यासंदर्भात म्हणाल्या...

अकाली दलाने केंद्राच्या कृषी विधेयकाला विरोध दर्शवला. याच मुद्द्यावर हरसीमरत कौर बादल यांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा देताच, आपला पक्ष एनडीएतून बाहेर पडत असल्याची टोकाची भूमिका घेतली. यामुळे भविष्यात भाजपाची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे.

अकाली दलाच्या एनडीएतून बाहेर पडण्याच्या निर्णयाचे अनेक पक्षांनी स्वागत केले आहे. यासंदर्भात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही ट्विट केले आहे. यात, अकाली दलाचे सर्वेसर्वा प्रकाश सिंग बादल. अकाली दलाचे अध्यक्ष सुखबीर सिंग बादल आणि खासदार हरसीमरत कौर बादल यांचा उल्लेख करत, "कृषी विधेयकांना विरोध करून एनडीएतून बाहेर पडल्याबद्दल आपले अभिनंदन. तसेच आपण शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिल्याबद्दल आभार," असे पवारांनी म्हटले आहे. 

ShriKrishna JanamBhoomi: श्रीकृष्ण जन्मभूमीप्रकरणी 30 तारखेला सुनावणी, शाही ईदगाह हटविण्याची मागणी

संजय राउत म्हणाले - 
पवारांपूर्वी, शिवसेना नेते तथा मुख्य प्रवक्ते संजय राऊत यांनीही ट्विट करत, शेतकऱ्यांच्या बाजूने उभे राहत एनडीएतून बेहेर पडल्याबद्दल अकाली दलाचे कौतुक केले होते. 

जयंती विशेष: मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी हसत-हसत फासावर गेले भगत सिंग; कुणी दिलं होतं त्यांना हे नाव?

एवढेच नाही, तर शिवसेना आणि अकाली दल हे एनडीएचे दोन मजबूत स्तंभ होते. काही दिवसांपूर्वी शिवसेनेला नाईलाजास्तव एनडीएमधून बाहेर पडावे लागले. आता अकाली दलानेही एनडीएला सोडचिठ्ठी दिली आहे. तर एनडीएत भाजपाला आता नवे मित्र मिळाले आहेत. मी त्यांना शुभेच्छा देतो. मात्र ज्या आघाडीमध्ये शिवसेना आणि अकाली दल नाहीत, अशा आघाडीला मी एनडीए मानत नाही, असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे, असेही राऊतांनी म्हटले होते.

SBI देतेय मोठी संधी, अत्यंत कमी किंमतीत खरेदी करा घर, दुकान आणि प्लॉट

Web Title: NCP leader sharad pawar congratulates akali dal for quitting bjp led NDA

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.