Supriya Sule : "ज्यांनी काही केलं नाही असे आमचे दोन नेते आज तुरुंगात," सुप्रिया सुळे यांचं वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2022 01:38 PM2022-06-06T13:38:17+5:302022-06-06T14:02:27+5:30

NCP Leader Supriya Sule commented on Nawab Malik Anil Deshmukh ed raid in jail will ask Narendra Modi and Amit Shah"जेव्हा ते दोघं जण बाहेर येतील आणि त्यांना क्लिन चीट मिळेल, तेव्हा माझं हे रकॉर्डिंग नक्की दाखवा" - सुप्रिया सुळे

ncp leader supriya sule commented on nawab malik anil deshmukh ed raid in jail will ask narendra modi and amit shah | Supriya Sule : "ज्यांनी काही केलं नाही असे आमचे दोन नेते आज तुरुंगात," सुप्रिया सुळे यांचं वक्तव्य

Supriya Sule : "ज्यांनी काही केलं नाही असे आमचे दोन नेते आज तुरुंगात," सुप्रिया सुळे यांचं वक्तव्य

Next

माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे NCP Leader Supriya Sule  यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. “आमचे दोन नेते, ज्यांनी काहीही केलं नाही ते सध्या तुरुंगात आहेत. आज नाही तर उद्या आम्हाला न्यायालयाकडून न्याय मिळेल असा आम्हाला विश्वास आहे. माझं हे बोलणं रेकॉर्ड करून ठेवा. जेव्हा ते दोघं जण बाहेर येतील आणि त्यांना क्लिन चीट मिळेल, तेव्हा माझं हे रकॉर्डिंग नक्की दाखवा,” असं सुळे म्हणाल्या.

“दोन्ही केसेस मध्ये काय होतंय हे मला माहित आहे. कशाप्रकारे जे केंद्राविरोधात बोलतायत त्यांच्यावर कारवाई सुरू आहे. तुम्ही डेटा काढून पाहा, जे केंद्राविरोधात बोलतायत त्यांच्यावरच धाड टाकली जात आहे. त्यांचा जागतिक विक्रम आहे. त्यांनी १०९ वेळा देशमुख कुटुंबीयांच्या घरी धाड टाकली आहे. १०८ वेळा धाड टाकताना काय केलं? १०९ व्यांदा धाड टाकावी लागली कारण त्यांना १०८ वेळा काहीच मिळालं नाही.” असंही सुप्रिया सुळे यांनी म्हटलं.


“हे सर्व आश्चर्यचकित करणारं आहे. ज्या व्यक्तीवर सर्व व्यक्तीवर आरोप आहेत, तोच आच माफीचा साक्षीदार होतोय, हे दुसरं आश्चर्य आहे. ज्यांनी स्वत: कबुल केलंय तो आज माफीचा साक्षीदार कसा बनू शकतो, हा कोणता न्याय आहे. मोदीजी तुम्ही हा कोणता न्याय करताय असं मी पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांना संसदेत विचारणार आहे. मी मोदीजींपासून नाराज नाही पण नक्कीच आश्चर्य वाटतंय की हे काय होतंय?,” असंही त्यांनी म्हटलं.

Web Title: ncp leader supriya sule commented on nawab malik anil deshmukh ed raid in jail will ask narendra modi and amit shah

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.