"नवं सरकार स्थापन करुन महिना होत आला तरी मंत्रिमंडळ नाही ही राज्याच्या दृष्टीने शोकांतिका"
By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2022 06:10 PM2022-07-27T18:10:10+5:302022-07-27T18:11:38+5:30
NCP Mahesh Tapase : शिवसेनेत एवढं मोठं बंड करून नवीन सरकार स्थापन केले मात्र आतापर्यंत फक्त मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या व्यतिरिक्त मंत्रिमंडळाचा विस्तार करू शकत नाही हे दुर्दैवी आहे असेही महेश तपासे म्हणाले.
मुंबई - एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांना शपथ घेऊन महिना होत आला तरी मंत्रिमंडळ स्थापन करू शकत नाही ही राज्याच्यादृष्टीने फार मोठी शोकांतिका आहे अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी शिंदे सरकारवर तोफ डागली आहे.
सरकार स्थापन झाल्यानंतर ९० हून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केली तर साडेआठ लाख हेक्टरवरील शेतीचे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. या शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा निर्णय या सरकारने अद्याप घेतलेला नाही.
मंत्रिमंडळाच्या विस्ताराच्या नावाखाली त्यांना सारखंसारखं दिल्लीला जावं लागत आहे. दिल्लीश्वरांची मर्जी राखावी लागत आहे. तरीदेखील दिल्लीतून मंत्रीमंडळ विस्ताराचा हिरवा कंदील मिळत नाही. किती दिवस दिल्लीत जाऊन स्वतः चा अपमान करुन घेत आहात असा रोखठोक सवालही महेश तपासे यांनी केला आहे.
शिवसेनेत एवढं मोठं बंड करून नवीन सरकार स्थापन केले मात्र आतापर्यंत फक्त मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या व्यतिरिक्त मंत्रिमंडळाचा विस्तार करू शकत नाही हे दुर्दैवी आहे असेही महेश तपासे म्हणाले.