"अग्निपथ ही योजना आणून मोदी सरकारने देशातील बेरोजगार तरुणांची क्रूर चेष्टा केलीय"

By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2022 02:01 PM2022-06-17T14:01:37+5:302022-06-17T14:05:00+5:30

Modi Government And Agnipath Scheme : आयुष्यभराची बेरोजगारी अशी 'अग्निपथ' ही योजना असून या योजनेला देशभरातून तरुण पिढी विरोध करत आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचाही या योजनेला विरोध असल्याचे महेश तपासे म्हणाले.

NCP Mahesh Tapase Slams Modi Government Over Agnipath Scheme | "अग्निपथ ही योजना आणून मोदी सरकारने देशातील बेरोजगार तरुणांची क्रूर चेष्टा केलीय"

"अग्निपथ ही योजना आणून मोदी सरकारने देशातील बेरोजगार तरुणांची क्रूर चेष्टा केलीय"

googlenewsNext

मुंबई - 'अग्निपथ' (Agnipath Scheme) ही चार वर्षासाठी भारतीय सैन्यातील भरती म्हणजे आयुष्यभराची बेरोजगारी असून ही योजना आणून मोदी सरकारने (Modi Government ) देशातील बेरोजगार तरुणांची क्रूर चेष्टा केली आहे असा जोरदार हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे (NCP Mahesh Tapase) यांनी केला आहे.

एकीकडे 'वन रँक वन पेंशन' अशी योजना करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी दुसरीकडे बेरोजगार तरुणांसाठी 'अग्निपथ' अशी योजना आणून त्यात 'नो रँक नो पेंशन नो ग्रॅज्युईटी' आणतात. त्यामुळे ही योजनाच बंद करून केंद्र सरकारने तरुणांसाठी कायमस्वरूपी योजना आणावी अशी मागणीही महेश तपासे यांनी केली आहे. आयुष्यभराची बेरोजगारी अशी 'अग्निपथ' ही योजना असून या योजनेला देशभरातून तरुण पिढी विरोध करत आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचाही या योजनेला विरोध असल्याचे महेश तपासे म्हणाले.

प्रत्येक वर्षी २ कोटी रोजगार देण्यात मोदी सरकार गेल्या आठ वर्षांत अपयशी ठरले आहे. आम्ही फक्त रोजगार दिला हे भासवण्यासाठी 'अग्निपथ' ही पोकळ योजना आणल्याचा आरोप करतानाच साडे सतरा ते २३ वर्ष हे तरुणांचे उमेदीचे वर्ष असून २४ किंवा २५ व्या वर्षी निवृत्त होऊन या तरुणांनी पुढे काय करायचे? असा संतप्त सवालही महेश तपासे यांनी केंद्रसरकारला केला आहे.

हिंसक वळण! अग्निपथ योजनेच्या विरोधकांनी रेल्वेला लावली आग; स्टेशनची तोडफोड

केंद्र सरकारने सैन्यात तरुणांची भरती करण्यासाठी जाहीर केलेल्या अग्निपथ योजनेला बिहार, राजस्थान आणि उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये तरुणांकडून जोरदार विरोध सुरू झाला आहे. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी अग्निपथ योजनेची घोषणा केल्यानंतर ठिकठिकाणी निदर्शने सुरू झाली आहेत. आता सलग तिसऱ्या दिवशी हे आंदोलन हिंसक झालं असून परिस्थिती हाताबाहेर गेल्याचं पाहायला मिळत आहे. बिहारमध्ये या योजनेला तीव्र विरोध होत आहे. शुक्रवारी देखील राज्यातील अनेक भागात या योजनेच्या विरोधात तरूण रस्त्यावर उतरले. लखीसराय आणि समस्तीपूरमध्ये संतप्त आंदोलकांनी रेल्वेला आग लावली. त्याचबरोबर रेल्वे स्टेशनचीही तोडफोड केली. 

 

Web Title: NCP Mahesh Tapase Slams Modi Government Over Agnipath Scheme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.