Ramdev Baba: "कुठं ते गाडगेबाबा आणि कुठे हा रामदेव बाबा?", अमोल मिटकरींनी साधला निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2022 05:37 PM2022-11-25T17:37:22+5:302022-11-25T17:39:21+5:30
पतंजलीचे प्रमुख योगगुरू बाबा रामदेव यांनी महिलांबाबत एक वादग्रस्त व्यक्तव्य केले आहे.
मुंबई : आपल्या वक्तव्यामुळे नेहमी चर्चेत असणारे पतंजलीचे प्रमुख योगगुरू बाबा रामदेव यांनी महिलांबाबत एक वादग्रस्त व्यक्तव्य केले आहे. पतंजलीच्या मोफत योग शिबिरात बोलत असताना बाबा रामदेव म्हणाले की, "महिला साडीमध्ये छान दिसतात, सलवार-सुटमध्येही(पंबाजी ड्रेस) छान दिसतात. आणि माझ्या नजरेने पाहिले तर, काही घातले नाही तरी छान दिसतात." बाबा रामदेव यांनी केलेल्या या वक्तव्यानंतर वाद चिघळला आहे. यावरूनच आता राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी सडकून टीका केली आहे.
खरं तर बाबा रामदेव यांनी हे वक्तव्य केले, तेव्हा मंचावर त्यांच्या शेजारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र, खासदार श्रीकांत शिंदे हे देखील उपस्थित होते. आता रामदेव बाबांच्या या वक्तव्यामुळे नवीन वादाला तोंड फुटले आहे. अशातच आमदार अमोल मिटकरी यांनी महाराष्ट्राच्या संस्कृतीचे उदाहरण देत बाबा रामदेव यांच्या विधानावर टीका केली आहे.
मिटकरींनी साधला निशाणा
अमोल मिटकरी यांनी ट्विटच्या माध्यमातून म्हटले, "कुठं ते गाडगेबाबा आणि कुठे हा रामदेव बाबा? महाराष्ट्रात तुकोबा ते गाडगेबाबा अशी संतांची सुसंस्कृत परंपरा आहे. आज रामदेव बाबांनी स्त्रियांचा अपमान करून या परंपरेला तडा दिला आहे. "छाटी भगवी मानसी ! व्यर्थ म्हणे मी संन्यासी !तुका म्हणे तोचि वेडाl त्याचे हाणूनी थोबाड फोडा ll."
कुठं ते गाडगेबाबा आणि कुठे हा रामदेव बाबा ? महाराष्ट्रात तुकोबा ते गाडगेबाबा अशी संतांची सुसंस्कृत परंपरा आहे. आज रामदेव बाबांनी स्त्रियांचा अपमान करून या परंपरेला तडा दिला आहे .
— आ. अमोल रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) November 25, 2022
"छाटी भगवी मानसी !
व्यर्थ म्हणे मी संन्यासी !तुका म्हणे तोचि वेडाl त्याचे हाणूनी थोबाड फोडा ll
अमृता फडणवीसांचे केले कौतुक
यावेळी बाबा रामदेव यांनी अमृता फडणवीस यांचे कौतुक केले. अमृता फडणवीस हिशोबात अन्न ग्रहण करतात. पुढील शंभर वर्षे त्या म्हाताऱ्या होणार नाहीत. याचे कारण म्हणजे त्या नेहमी आनंदी राहतात, असे बाबा रामदेव म्हणाले. तसेच जसा आनंद अमृता फडणवीस यांच्या चेहऱ्यावर असतो, तसाच आनंद मला तुमच्या (उपस्थित महिला) चेहऱ्यावर पाहायचा आहे, असेही त्यांनी म्हटले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"