"राष्ट्रपतींऐवजी महाराज लोकांना सन्मान...", अमोल मिटकरींची भाजप सरकारवर सडकून टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2023 02:02 PM2023-05-28T14:02:15+5:302023-05-28T14:02:53+5:30
new parliament building inauguration : नव्या संसद भवनाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमावर विरोधकांनी बहिष्कार टाकला आहे.
आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नव्या संसद भवनाचं उद्घाटन झालं. सत्ताधारी भाजप या कार्यक्रमाचा इव्हेंट करत असून राष्ट्रपतींच्या हस्ते उद्घाटन न झाल्याने विरोधकांनी या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला आहे. उद्घाटन सोहळ्यादरम्यान दिल्लीत मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. नरेंद्र मोदी यांनी पूजा आणि हवन केल्यानंतर सेंगोलची पूजा केली. मोदींनी सेंगोलच्या राजदंडाला साष्टांग नमस्कार केला. यासोबतच त्यांनी उपस्थित साधूसंताचे आशीर्वादही घेतले. वैदिक मंत्रोच्चाराने संपूर्ण वातावरण दुमदुमून गेले. तर विरोधक सातत्याने मोदी सरकावर टीका करत आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी देखील ट्विटच्या माध्यमातून केंद्रातील भाजप सरकारला लक्ष्य केले.
"देशात लोकशाही अस्त... सम्राट अशोक कालीन परंपरा खोडून काढत संविधान मोडीत काढण्याचा अफलातून प्रयोग. राष्ट्रपतींऐवजी महाराज लोकांना सन्मान, लोकशाहीच्या पवित्र स्थळी आज कर्मकांड ब्लॅक डे", अशा आशयाचे ट्विट करत मिटकरींनी आपला संताप व्यक्त केला. पंतप्रधान नरेंद्र मोदींऐवजी राष्ट्रपतींनी या नवीन वास्तूचे उद्घाटन करावं, अशी विरोधकांची मागणी होती.
देशात लोकशाही अस्त... सम्राट अशोक कालीन परंपरा खोडून काढत संविधान मोडीत काढण्याचा अफलातून प्रयोग. राष्ट्रपतीऐवजी महाराज लोकांना सन्मान, लोकशाहीच्या पवित्र स्थळी आज कर्मकांड ब्लॅक डे ..#shamepic.twitter.com/SpCWDSJmNP
— आ. अमोल रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) May 28, 2023
शरद पवारांची टीका
"सकाळी कार्यक्रम पाहिला. पण मला आनंद आहे की मी तिथे गेलो नाही. तिथे जे काही घडले ते पाहून मला काळजी वाटते. आपण देशाला मागे नेत आहोत का? हा कार्यक्रम फक्त मर्यादित लोकांसाठीच होता का?", अशा शब्दांत राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मोदी सरकारवर टीका केली.
I saw the event in the morning. I am happy I didn't go there. I am worried after seeing whatever happened there. Are we taking the country backwards? Was this event for limited people only?: NCP chief Sharad Pawar on the inauguration of the new Parliament with havan, multi-faith… pic.twitter.com/fdRC7K5Ccp
— ANI (@ANI) May 28, 2023
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी देखील नवीन संसद भवनाच्या मुद्द्यावरून भाजप सरकारला लक्ष्य केले. "संसदेचा इव्हेंट करू नका, ते लोकशाहीतलं आमचं मंदिर आहे. ही लोकशाही आहे, दडपशाही नाही", अशा शब्दांत सुप्रिया सुळेंनी टीका केली. "ही लोकशाही आहे, दडपशाही नाही. लोकशाहीमध्ये विरोधक आणि सत्तेतले असे दोन्ही लोक असले पाहिजेत आणि सर्वांचा समन्वय साधूनच देश चालतो. नऊ वर्षात अनेकदा असं झालं आहे की सरकारमधले महत्त्वाचे मंत्री, त्यांना जेव्हा बिल पास करायचे असतात तेव्हा या देशाच्या विरोधी पक्षाच्या नेत्यांना त्यांनी फोन केलेले आहेत", असं त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितलं.