अपशब्द वापरल्याने राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड निलंबित

By admin | Published: December 12, 2014 01:11 PM2014-12-12T13:11:46+5:302014-12-12T13:43:14+5:30

विधानसभेत गोंधळ घालत अपशब्द वापरल्याने राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना हिवाळी अधिवेशन संपेपर्यंत निलंबित करण्यात आले आहे.

NCP MLA Jitendra Awhad suspended for using abusive behavior | अपशब्द वापरल्याने राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड निलंबित

अपशब्द वापरल्याने राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड निलंबित

Next

 ऑनलाइ लोकमत

नागपूर, दि. १२ - विधानसभेत गोंधळ घालत अपशब्द वापरल्याने राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना हिवाळी अधिवेशन संपेपर्यंत निलंबित करण्यात आले आहे. शेतक-यांना देण्यात येणा-या पॅकेजच्या मुद्यावरून आव्हाडांनी वेलमध्ये येऊन गोंधळ घातला तसेच काही अपशब्द उच्चारले. त्यामुळे सभापतींनी त्यांच्यावर ही कारवाई केली आहे.

शुक्रवारी दुष्काळग्रस्त शेतक-यांसाठी सरकारने जाहीर केलेल्या पॅकेजबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उत्तर देत असताना जितेंद्र आव्हाड वेलमध्ये आले व त्यांनी गोंधळ घालण्यास सुरूवात केली. तसेच काही अपशब्दही उच्चारले. त्यामुळे त्यांना निलंबित करण्यात आले.

आव्हाडांच्या निलंबनांच्या निषेधार्थ काँग्रेस - राष्ट्रवादीने सभात्याग केला असून आज सभागृहात होणा-या कामकाजात दोन्ही पक्षांचे आमदार सहभागी होणार नाहीत. 

 

Web Title: NCP MLA Jitendra Awhad suspended for using abusive behavior

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.