"स्वतःच्या मुलाचा जीव धोक्यात घालून परीक्षेला पाठवू का?", रोहित पवारांचा UGC अधिकाऱ्यांना सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2020 03:55 PM2020-07-17T15:55:38+5:302020-07-17T16:18:39+5:30
कोरोना संकट काळात महाराष्ट्र, दिल्ली, ओडिशा यासारख्या राज्यांनी परीक्षा घेण्यास ठाम नकार दिला आहे. परीक्षेसंदर्भात रोहित पवार यांनी थेट यूजीसीच्या अधिकाऱ्यांनाच सवाल केला आहे.
मुंबई - देश कोरोना व्हायरसचा सामना करण्यासाठी सज्ज झाला आहे. कोरोना संकट काळात महाराष्ट्र, दिल्ली, ओडिशा यासारख्या राज्यांनी परीक्षा घेण्यास ठाम नकार दिला आहे. तरीही विद्यापीठ अनुदान आयोग मात्र परीक्षा घेण्याच्या आग्रहावर कायम आहे. कायद्यानुसार राज्य सरकारेही विद्यापीठांना परीक्षा न घेताच पदव्या देण्यास सांगू शकत नाहीत, असं आयोगाचं म्हणणं आहे. याच दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी यूजीसीवर निशाणा साधला आहे.
परीक्षेसंदर्भात रोहित पवार यांनी थेट यूजीसीच्या अधिकाऱ्यांनाच सवाल केला आहे. कोरोनाच्या आजच्या परिस्थितीत आपण स्वतःच्या मुलाला तरी त्याचा जीव धोक्यात घालून परीक्षेतला पाठवू का? हा प्रश्न यूजीसीच्या अधिकाऱ्यांनी स्वतःला विचारावा तसेच विद्यार्थ्यांच्या सहनशीलतेचा अंत न पाहता 'परीक्षा' या विषयाचा एकदाचा 'निकाल' लावावा असं रोहित यांनी म्हटलं आहे. रोहित पवार यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून यासंबंधीचे ट्विट केले आहे.
कोरोनाच्या आजच्या परिस्थितीत आपण स्वतःच्या मुलाला तरी त्याचा जीव धोक्यात घालून परीक्षेला पाठवू का? हा प्रश्न #UGC च्या अधिकाऱ्यांनी स्वतःला विचारावा आणि विद्यार्थ्यांच्या सहनशीलतेचा अंत न पाहता 'परीक्षा' या विषयाचा एकदाचा 'निकाल' लावावा.
— Rohit Pawar (@RRPSpeaks) July 16, 2020
"कोरोनाला घाबरुन स्वतः सुरक्षितपणे ऑनलाईन मिटींग घेणाऱ्या #UGC च्या अधिकाऱ्यांनी परीक्षेचा आग्रह धरून विद्यार्थ्यांच्या जिवाशी खेळू नये. प्रचंड मानसिक तणावात असलेले राज्याच्या कानाकोपऱ्यातील अनेक विद्यार्थी परिक्षेबाबत त्यांच्या तीव्र भावना रोज आम्हा लोकप्रतिनिधींकडे व्यक्त करतात. कोरोनाच्या आजच्या परिस्थितीत आपण स्वतःच्या मुलाला तरी त्याचा जीव धोक्यात घालून परीक्षेला पाठवू का? हा प्रश्न #UGC च्या अधिकाऱ्यांनी स्वतःला विचारावा आणि विद्यार्थ्यांच्या सहनशीलतेचा अंत न पाहता 'परीक्षा' या विषयाचा एकदाचा 'निकाल' लावावा." असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.
CoronaVirus News : दिलासादायक! कोरोना हरणार, देश जिंकणार... लवकरच व्हायरसवर मात करता येणारhttps://t.co/KBUzXPnN7z#coronavirus#CoronaUpdatesInIndia#COVID19India#CoronavirusIndia
— Lokmat (@MiLOKMAT) July 17, 2020
पदवी अभ्यासक्रमांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्यास देशातील २३४ विद्यापीठे तयार असून, १७७ विद्यापीठांनी मात्र परीक्षा कधी घ्यायच्या, हे अद्याप ठरविलेले नाही. परीक्षा न घेताच विद्यार्थ्यांना पदवी देणे योग्य होणार नाही अशी भूमिका घेऊन विद्यापीठांनी या परीक्षा घ्याव्यात असा आग्रह विद्यापीठ अनुदान आयोगाने धरला आहे. त्यामुळे लाखो विद्यार्थ्यांच्या परीक्षेबाबत अनिश्चतता आहे.
देशातील तब्बल १७७ विद्यापीठांनी या परीक्षा घेणार का किंवा केव्हा घेणार याविषयी अद्याप निर्णय घेतलेला नाही.
CoronaVirus News : महासत्ता असलेल्या अमेरिकेत कोरोनाचा हाहाकार! रुग्णांची संख्या 35 लाखांवरhttps://t.co/ReDBBXswBn#coronavirus#CoronaUpdate#America
— Lokmat (@MiLOKMAT) July 17, 2020
महत्त्वाच्या बातम्या
CoronaVirus News : कोरोनाला रोखण्यात यश! हॉटस्पॉट ठरलेल्या 'या' राज्याने लगावला आनंदाचा 'सिक्सर'
CoronaVirus News : काय सांगता? मास्क लावायला विसरल्या मंत्री, भीतीने केलं असं काही...; Video व्हायरल
भयंकर! चॅनल बदलण्यासाठी रिमोटचा हट्ट बेतला जीवावर, 7 वर्षांच्या चिमुकलीची हत्या
CoronaVirus News : त्या तिघांनी दिले पाचशेहून अधिक कोरोनारुग्णांना जीवनदान
बापरे! बेडच्या बॉक्समध्ये चुकून लॉक झाल्या आजी अन्..; जाणून घ्या नेमकं काय घडलं?
CoronaVirus News : कोरोनापुढे अमेरिकाही हतबल! 24 तासांत आढळले तब्बल 68,428 नवे रुग्ण
CoronaVirus News : 'प्लाझ्मा दान करा आणि 5000 मिळवा'; 'या' सरकारने घेतला मोठा निर्णय