मुंबईत राष्ट्रवादी, मनसे भुईसपाट

By admin | Published: October 20, 2014 05:32 AM2014-10-20T05:32:58+5:302014-10-20T05:32:58+5:30

विधानसभेच्या रणांगणातील अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणा-या मुंबईच्या मैदानात भाजपा, शिवसेनेने सरशी साधत अनुक्रमे १५ व १४ जागा काबीज केल्या आहेत

NCP, MNS Bhuissapat in Mumbai | मुंबईत राष्ट्रवादी, मनसे भुईसपाट

मुंबईत राष्ट्रवादी, मनसे भुईसपाट

Next

मुंबई : विधानसभेच्या रणांगणातील अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणा-या मुंबईच्या मैदानात भाजपा, शिवसेनेने सरशी साधत अनुक्रमे १५ व १४ जागा काबीज केल्या आहेत. काँग्रेसने २००९मध्ये मनसे इफेक्टमुळे मिळवलेल्या तब्बल १७ जागांपैकी केवळ ५ जागा वाचवण्यात काँग्रेसला यश आले आहे. मनसे आणि राष्ट्रवादी पूर्णपणे भुईसपाट झाली आहे.
समाजवादी पार्टीने मानखुर्द-शिवाजीनगरची जागा कौशल्याने राखली. अबू आझमी येथून निवडून आले, तर एमआयएमने पहिल्याच प्रयत्नात खाते उघडून भायखळ्यासारख्या महत्त्वाच्या मतदारसंघात झेंडा रोवला. काँग्रेसच्या निवडून आलेल्या ५पैकी ३ आमदार अल्पसंख्याक समाजाचे आहेत, हे विशेष! काँग्रेसने काही प्रमाणात का होईना, व्होटबँक राखण्याचा प्रयत्न केल्याचे निकालातून दिसून येते. काँग्रेसच्या दिग्गजांना धूळ चारण्यात शिवसेनेने बाजी मारली आहे. जर सेना-भाजपा एकत्र लढले असते तर विरोधकांचा सफाया झाला असता. (प्रतिनिधी)

Web Title: NCP, MNS Bhuissapat in Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.