एनसीपी म्हणजे राष्ट्रवादी कनफ्युज पार्टी - मुख्यमंत्री
By Admin | Published: February 13, 2017 10:20 PM2017-02-13T22:20:24+5:302017-02-13T22:20:24+5:30
निवडणुकीच्या काळात एकमेकांवर आरोप प्रत्यारोप प्रचंड प्रमाणात होत आहेत. राष्ट्रवादीच्या बालेकिल्ला असलेल्या पिंपरीमध्ये मुख्यमंत्र्यांनी जाहिर सभा घेत राष्ट्रवादीवर टीका केली आहे.
ऑनलाईन लोकमत
पिंपरी चिंचवड, दि. 13 - निवडणुकीच्या काळात एकमेकांवर आरोप प्रत्यारोप प्रचंड प्रमाणात होत आहेत. राष्ट्रवादीच्या बालेकिल्ला असलेल्या पिंपरीमध्ये मुख्यमंत्र्यांनी जाहिर सभा घेत राष्ट्रवादीवर टीका केली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये अनेक गुंडांना भाजपने प्रवेश देऊन पवित्र करुन घेतलेत, असा आरोप राष्ट्रवादीने केला. त्याला उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले की राष्ट्रवादी हा संभ्रमात असलेला पक्ष आहे, त्यामुळे त्यांनी त्यांचं नाव ह्यराष्ट्रवादी कनफ्युज पार्टीह्ण असं ठेवायला हवं.
पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादीकडे राहणार नाही. आपण सगळ्यांनी राष्ट्रवादीचा भ्रष्टाचार पाहिला आहे. काँग्रेसचे तर अस्तित्वच दिसत नाही असे मुख्यमंत्री म्हणाले. शिवसेनेचे नाव न घेता त्यांनी त्यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली. कुठे कुणासोबत युती करायला मिळते का असा विचार आमचा मित्रपक्ष करत आहे.
पुणे हे महाराष्ट्राचे ह्यपॉवर हाऊसह्ण आहे. जगभरातले उद्योजक गुंतवणुकीसाठी पुण्याचाच विचार करतात. मात्र जागतिक व्यवसायाचे केंद्र म्हणून पुण्याचा विचार असा कधी झालेलाच नाही. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील राजधानी बनण्याची क्षमता पुण्यामध्ये आहे.याचबरोबर, येत्या तीन वर्षांत पुण्यास देशाचे स्टार्ट अप कॅपिटल बनवू, असं अश्वासनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिलं.