CoronaVirus: “निवडणुकानंतर पंतप्रधान मोदींचा ‘तेल का दाम बढाओ’ कार्यक्रम सुरू”
By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2021 01:38 PM2021-05-08T13:38:57+5:302021-05-08T13:41:17+5:30
CoronaVirus: कोरोना परिस्थिती हाताळण्यात मोदी सरकार अपयशी ठरले आहेच. शिवाय हतबलही झाल्याचे चित्र पाहायला मिळत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
मुंबई: आजच्या घडीला देशामध्ये दरदिवशी ४ लाख कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळत आहेत. ही कोरोना परिस्थिती हाताळण्यात मोदी सरकार अपयशी ठरले आहेच. शिवाय हतबलही झाल्याचे चित्र पाहायला मिळत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे. (ncp nawab malik alleged pm narendra modi over corona situation and fuel price hike)
सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टाने कोरोना परिस्थितीसंदर्भात आदेश देऊन केंद्रसरकारला जबाबदारीची जाणीव करून दिली आहे. मात्र, केंद्र सरकार यामध्ये हतबल झाल्याचे दिसून येत आहे. राज्यांना ऑक्सिजन साठा निश्चित केल्यानंतरही दिला जात नसल्याची सत्यपरिस्थिती आहे. दोन दिवसांपासून कर्नाटकच्या प्लांटमधून येणारा ५० टँकचा कोटा राज्याला मिळेनासा झाला आहे. रेमडेसिवीरचा साठा देऊनही वेळेत वितरीत करता येत नाही, असेही नवाब मलिक म्हणाले.
लोकांचे जीव जातायत, पण पंतप्रधानांची टॅक्स वसुली सुरूच; राहुल गांधींची टीका
पंतप्रधान मोदींचा ‘तेल का दाम बढाओ’ कार्यक्रम सुरू
पाच राज्यांच्या निवडणुकीच्या निकालानंतर पंतप्रधान मोदी साहेबांचा ‘तेल का दाम बढाओ’ कार्यक्रम सुरू झालेला आहे. एकीकडे अर्थव्यवस्था व्यवस्थित नाही, महागाई वाढत आहे, लोक बेरोजगार झाले आहेत आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये पेट्रोल, डिझेल, गॅसचे भाव वाढवणे म्हणजे लोकांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केंद्र सरकार करत आहे. महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यात १०० च्या पार पेट्रोलचा भाव गेला आहे. आमची मागणी आहे की, केंद्रानी आतातरी ही लूट थांबवावी, असे नवाब मलिक यांनी ट्विट करत सांगितले.
गॅसचे भाव वाढवणे म्हणजे लोकांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केंद्र सरकार करत आहे. महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यात १०० च्या पार पेट्रोलचा भाव गेला आहे.आमची मागणी आहे की, केंद्रानी आतातरी ही लूट थांबवावी.(२/२)
— NCP Mumbai (@MumbaiNCP) May 8, 2021
- कॅबिनेट मंत्री ना.@nawabmalikncp साहेब
“शरद पवारांची बार मालकांसाठी कळकळ पाहून कंठ दाटून आला, शेतकऱ्यांसाठीही पत्राची अपेक्षा”
लसीकरणाचा कार्यक्रम ठप्प
लसीकरणाचा कार्यक्रम ठप्प झाला आहे. पहिला डोस घेतलेले साडेचार लाख लोक आहेत. ते दुसरा डोस घेण्यास पात्र असताना डोस देता येत नाहीय. शिवाय राज्यसरकारने ठरवलेल्या कार्यक्रमासाठी कंपन्यांकडून लस नाही असेही नवाब मलिक यांनी सांगितले. लवकरात लवकर लस द्या, ५० टन ऑक्सिजन कोटा पडून आहे. शिवाय रेमडेसिवीरचा साठा तात्काळ द्या, अशी मागणीही नवाब मलिक यांनी केली आहे.
“हे सर्व हृदय पिळवटून टाकणारं, आम्ही भारतासोबत दृढ निश्चयाने उभे आहोत”: कमला हॅरिस
रेमडेसिवीर वेळेत पुरवठा होत नाही
मोदी सरकार फक्त भाषणे आणि घोषणा करणे व वेळकाढूपणा करणे ही भूमिका घेत आहे. आम्हाला ऑक्सिजन मिळत नाहीय, रेमडेसिवीर वेळेत पुरवठा होत नाहीय, आता साडेचार लाख लोकांना दुसरा डोस देता येत नाहीय. जाणूनबुजून केंद्रसरकार अन्याय करतेय की, केंद्रसरकारला काम करता येत नाही, असा टोलाही नवाब मलिक यांनी लगावला.