Indian Economy: “...तर देशाची अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडून पडेल”: नवाब मलिक
By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2021 03:09 PM2021-06-05T15:09:43+5:302021-06-05T15:13:09+5:30
Indian Economy: राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी देशाच्या अर्थव्यवस्थेवरून टीका केली आहे.
मुंबई: राज्यातील महाविकास आघाडी सरकार आणि विरोधी भाजप पक्ष अनेकविध मुद्द्यांवरून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना दिसत आहेत. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी देशाच्या अर्थव्यवस्थेवरून टीका केली आहे. रिझर्व्ह बॅंकचे गव्हर्नर किंवा त्यांची संपूर्ण व्यवस्था देशाची अर्थव्यवस्था मोजण्यात अपयशी होत असेल, तर देशाची अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडून पडेल, असे मलिक यांनी म्हटले आहे. (ncp nawab malik criticises modi govt over economy)
देशाचा जीडीपी ७.५ मायनसमध्ये गेला ही सत्य परिस्थिती आहे. याचा अर्थ रिझर्व्ह बॅंकेकडून आकलन चुकीचे होत आहे. सरकार पैसे मागतेय तर तुम्ही देताय. रिझर्व्ह बॅंकेला हे कळले पाहिजे. तुम्ही अंदाज घेत नाही मग देशाची अर्थव्यवस्था कशी चालणार आहे, असा सवालही नवाब मलिक यांनी केला आहे.
“महाविकास आघाडी सरकार कधी कोसळेल ते कळणारही नाही, तसे संकेतच आहेत”
रिझर्व्ह बॅंकेने कबूल केले आहे हे चांगले आहे
रिझर्व्ह बॅंकेने कबूल केले आहे हे चांगले आहे. परंतु आकलन चुकत असेल, तर हे देशासाठी सारखे सारखे चांगले राहणार नाही, असेही मत नवाब मलिक यांनी मांडले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी बैठका घेत आहेत ही चांगली गोष्ट आहेत. परंतु, बैठका घेऊन फक्त या महिन्यात १२ कोटी, डिसेंबरपर्यंत २१० कोटी लसी उपलब्ध होईल, असे सांगणे किती योग्य आहे, अशी विचारणाही मलिक यांनी केली.
केंद्र किती खरेदी करणार, राज्यांना किती मिळणार?
केंद्र किती खरेदी करणार, राज्यांना किती मिळणार आणि खाजगी लोकांना खरेदी करून त्यांनी त्याचा वापर किती करावा याबाबतची स्पष्टता केंद्रसरकारने आजपर्यंत जाहीर केलेली नाही. कधी प्रकाश जावडेकर वेगळे बोलतात, तर कधी जे. पी. नड्डा वेगळी घोषणा करतात. फक्त वेगवेगळ्या हेडलाईन होण्यासाठी हे लोक बोलत असल्याचा आरोपही नवाब मलिक यांनी यावेळी केला आहे.
वाद वाढणार! ट्विटरने RSS सरसंघचालक मोहन भागवत यांच्या अकाऊंटची ब्ल्यू टिक हटवली
दरम्यान, १२ कोटी लस पुरवठा जूनपर्यंत होणार होता मात्र आतापर्यंत किती पुरवठा झाला. कालपर्यंत लसीकरण केंद्रे बंद होती. जी सत्यता आहे ती स्वीकारली पाहिजे आणि त्यानुसार कार्यक्रम बनवून देशासमोर ठेवावा, अशी मागणीही नवाब मलिक यांनी केली आहे.