Sharad Pawar: माणसातल्या "विठ्ठलाचे" दर्शन झाले; शरद पवारांसोबत प्रवास करणाऱ्या कार्यकर्त्याने व्यक्त केल्या भावना

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2022 07:00 PM2022-07-10T19:00:05+5:302022-07-10T19:14:09+5:30

Sharad Pawar: शरद पवार यांनी औरंगाबादच्या एका कार्यकर्त्याला स्वतःसोबत विमानातून बारामतीहून औरंगाबादला आणले. त्या कार्यकर्त्याने हा सर्व अनुभव शेअर केला आहे.

NCP president Shara Pawar take party worker with him and travel to Aurangabad in Plane | Sharad Pawar: माणसातल्या "विठ्ठलाचे" दर्शन झाले; शरद पवारांसोबत प्रवास करणाऱ्या कार्यकर्त्याने व्यक्त केल्या भावना

Sharad Pawar: माणसातल्या "विठ्ठलाचे" दर्शन झाले; शरद पवारांसोबत प्रवास करणाऱ्या कार्यकर्त्याने व्यक्त केल्या भावना

googlenewsNext

मुंबई: राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) सर्वसामान्यांचे नेते म्हणून ओळखले जातात. आपल्या पक्षांच्या समर्थकांना-कार्यकर्त्यांची ते नेहमी आपुलकीने विचारपूस करतात. असाच एक किस्सा औरंगाबादच्या कार्यकर्त्यासोबत घडला आहे. काही कामानिमित्त औरंगाबादचा एक कार्यकर्ता बारामतीला पवारांना भेटण्यासाठी गेला होता. परत येताना शरद पवारांनी त्या कार्यकर्त्याला स्वतःसोबत चक्क विमानातून औरंगाबादला आणले. 

डॉ. भारत चव्हाण असे त्या व्यक्तीचे नाव असून, ते सरपंच आहेत आणि अनेक वर्षांपासून राष्ट्रवादीसाठी काम करतात. त्यांनी शरद पवारांसोबत विमान प्रवासाचा अनुभव फेसबुकवर शेअर केला आहे. भारत चव्हाण यांनी फेसबुक वॉलवर शरद पवारांसोबतचे फोटोज शेयर करत संपूर्ण अनुभव मांडला. भरत चव्हाण यांची पोस्ट त्यांच्याच शब्दात- ''राजकारणाची कोणतीही पार्श्वभुमी नसलेल्या माझ्यासारख्या सर्वसामान्य तरुणाला शरद पवार साहेब जेव्हा विमानातुन स्वत:सोबत औरंगाबादला घेऊन जातात. हल्ली राजकारणात आपण पाहतो की राजकीय नेते जेंव्हा सर्वसामान्य लोकांना ऐकुण घेयला व भेटायला ही कंटाळा करतात त्यांच्या समस्या तर बाजूलाच राहिल्या पन भेटण्याच्याही सीमा ठरवतात तेव्हा एका सर्वसामान्य घरातून येणारा माझ्यासारखा तरुण म्हणून जेव्हा माझ्या काही अडचणी व प्रश्न खासदार शरद पवारसाहेबांना भेटून त्यांच्या कानावर घालावं म्हणून पवारसाहेबांना भेटण्यासाठी मी काल रात्री औरंगाबाद वरून बारामती गाठली. बारामतीचे नितीनदादा यादव यांच्या मदतीने तिथे पोहचल्यावर थांबण्याची व्यवस्था झाली व साहेबांची भेटीचीही वेळ मिळाली.''

''अंघोळ वगैरे करून सकाळी गोविंदबाग येथे साहेबांना भेटण्यासाठी उपस्थित राहिलो. साहेबांना भेटायला अनेक बाहेरगावावरून व स्थानिक पदाधिकारी मातब्बर नेते आले होते. मला साहेबांना भेटण्यासाठी आवाज देण्यात आला, आत गेल्याबरोबर रात्रभर प्रवास करून थकलेला चेहरा पाहून साहेबांनी विचारलं कुठून आलात ? मी औरंगाबादहुन असे उत्तर दिलं मग, साहेबांनी अडचणी काय आहेत वगैरे विचारल्या समजून घेतल्या मला खरंच खूप नवल वाटत होतं इतक्या उंचीचा नेता इतक्या आपुलकीने मी कुठला कोण पन माझे सर्व प्रश्न ऐकुण घेत होते, माझे पूर्ण बोलणं झाल्यावर साहेब स्मितहास्य करीत म्हणाले ठीक आहे बघतो मी काळजी करू नका !"

मी धन्यवाद साहेब म्हणत बाहेर पडणार तोच साहेबांनी पुन्हा आवाज दिला अन विचारले औरंगाबादवरून आला आहात ना परत कधी जाणार आहात? मी म्हटलं साहेब आता निघेल ! साहेब बोलले थांबा मी पण आज औरंगाबादलाच जातो आहे.तुम्हाला हरकत नसेल तर चला माझ्यासोबत ! हे शब्द ऐकुण मी स्वप्नात तर नाही ना असे मला राहुन राहुन वाटत होते.तितक्यात साहेबांनीच पुन्हा मला सांगितलं सोबतच जाऊयात. मग बाहेर साहेबांचे पीएस तथा उपजिल्हाधिकारी श्री. सतीश राउत यांना फोनवरुन मला सोबत घेण्याचे निर्देश दिले.त्यांच्याकडे गेल्यावर तेही बोलले साहेबांचा निरोप आहे, थांबा निघुयात आपण!"

"एका छोट्या मोठ्या पदावरुनही हवेत जाणारे व सर्वसामान्य लोकांना कुठलीच किंमत न देणारे नेते पुढारी अनेकदा अनुभवले पन याचीच दुसरी बाजु  सामान्य लोकांना आपलं समजून आपलंसं करणारे पवारसाहेब माझ्या प्रत्यक्ष नजरेतून आभाळाएवढया मोठ्या मनाचे आणि त्याहीपेक्षा जास्त उंचीचे प्रेमळ नेते आहेत इतकंच सांगू शकतो. माझ्यासारख्या एका तरुणासोबत शेती, राजकारण, समाजकारण,माझे कुटुंबातील लोक या व असंख्य विषयावर साहेबांनी विमानात त्यांच्या शेजारच्या सीटवर सोबत बसवुन चर्चा केली. म्हणुन तर साहेबांसोबत विमान प्रवास करताना अनेकदा डोळे भरुन येत होते अन राहुन राहुन वाटत होते, यामुळेच का काय, पवारसाहेब सर्वांचेच “साहेब” आहेत.
खूप खूप धन्यवाद आदरणीय पद्मविभूषण खासदार शरद पवारसाहेब ! शेवटी, आषाढी एकादिवशी मला माणसाच्यातल्या "विठ्ठलाचे" दर्शन झाल्याची भावना मनात आयुष्यभर निरंतर राहिल!" अशा भावना भरत चव्हाण यांनी व्यक्त केल्या.

Web Title: NCP president Shara Pawar take party worker with him and travel to Aurangabad in Plane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.