Maharashtra Politics: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस राज्यपालांना घाबरतात का?; रोहित पवारांचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2022 02:48 PM2022-11-20T14:48:04+5:302022-11-20T14:49:00+5:30

Maharashtra News: स्वातंत्र्यवीर सावरकरांवर बोलायला भाजप पुढे आले. पण आता कुठे दिसत नाहीत, अशी टीका रोहित पवारांनी केली आहे.

ncp rohit pawar criticised cm eknath shinde and devendra fadnavis over bhagat singh koshyari statment over chhatrapati shivaji maharaj | Maharashtra Politics: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस राज्यपालांना घाबरतात का?; रोहित पवारांचा सवाल

Maharashtra Politics: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस राज्यपालांना घाबरतात का?; रोहित पवारांचा सवाल

googlenewsNext

Maharashtra Politics: काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी वीर सावरकरांवर केलेल्या विधानांचे पडसाद अद्यापही उमटत असताना, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर केलेल्या वक्तव्यावरून विरोधकांकडून भाजप आणि राज्यपालांवर सडकून टीका केली जात आहे. यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे राज्यपालांना घाबरतात का, असा सवाल रोहित पवार यांनी केला आहे. 

 राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना महाराष्ट्रातून हटवा. ही व्यक्ती महाराष्ट्राला न शोभणारी आहे. एवढे दिवस ही व्यक्ती महाराष्ट्रात कशी काय राज्यपाल म्हणून राहते? त्यांच्या वक्तव्याचा निषेध केला पाहिजे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यावर काही बोलत नाही. ते राज्यपालांना घाबरतात का? असे रोहित पवार यांनी म्हटले आहे.

सावरकरांवर बोलायला पुढे आले, मात्र आता कुठे दिसत नाहीत

हे लोक राज्यपालांना घाबरतात की नाही माहीत नाही. पण महाराष्ट्र कधीही घाबरणार नाही. भाजप प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी घाणेरडे वक्तव्य केले. यांच्या पाठीशी नक्की कोण आहे? सत्तेत असलेली लोकं काही बोलत नाहीत. सावरकरांवर बोलायला पुढे आले. मात्र आता कुठे दिसत नाहीत, अशी टीका रोहित पवार यांनी केली. 

दरम्यान, शिवाजी महाराजांच्या विरोधात कोणी बोलत असेल आपण शांत कसे बसणार? ती आपली अस्मिता आहे इतिहास आहे. शिवाजी महाराज नसते तर आपली परिस्थिती बिहार आणि उत्तर प्रदेश पेक्षाही विचित्र झाली असती. या राज्याला वैचारिक बैठक आहे ती मलीन करण्याचा प्रयत्न होतो आहे. याला सगळ्यांनी विरोध केला पाहिजे, असे रोहित पवार यांनी म्हटले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

 

Web Title: ncp rohit pawar criticised cm eknath shinde and devendra fadnavis over bhagat singh koshyari statment over chhatrapati shivaji maharaj

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.