राज्याला एकत्रच ३-४ कोटी डोस उपलब्ध करून केंद्राने प्रश्न निकाली काढावा; रोहित पवारांचा सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2021 02:42 PM2021-04-08T14:42:24+5:302021-04-08T14:47:43+5:30

corona vaccination: राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी ट्विट करत केंद्रीय आरोग्यमंत्र्यांना सल्ला दिला आहे.

ncp rohit pawar react on corona vaccination drive in maharashtra | राज्याला एकत्रच ३-४ कोटी डोस उपलब्ध करून केंद्राने प्रश्न निकाली काढावा; रोहित पवारांचा सल्ला

राज्याला एकत्रच ३-४ कोटी डोस उपलब्ध करून केंद्राने प्रश्न निकाली काढावा; रोहित पवारांचा सल्ला

Next
ठळक मुद्देरोहित पवार यांचा केंद्रीय आरोग्यमंत्र्यांना सल्लाकोरोना लसी पुरवठ्याबाबत केली विनंतीनिवडणूक संपेपर्यंत तिथला कोरोना शांत बसला आहे - पवार

मुंबई: महाराष्ट्रासह देशात कोरोनाची स्थिती गंभीर होत चालल्याचे पाहायला मिळत आहे. देशात सलग तीन दिवसांपासून कोरोनाच्या रुग्णसंख्येने एक लाखांचा टप्पा ओलांडला आहे. तसेच राज्यात कोरोना लसीकरणावर (Corona Vaccination) भर दिला जात असताना, दुसरीकडे लसींचा तुटवडा असल्याचे सांगितले जात आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यासह अनेकांनी केंद्र सरकारला लसींचा पुरवठा करण्याबाबत विनंती केली आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी ट्विट करत केंद्रीय आरोग्यमंत्र्यांना सल्ला दिला आहे. (rohit pawar react on corona vaccination in maharashtra)

राज्यात कोरोना लसींचा केवळ दोन दिवस पुरेल, इतकाच साठा उपलब्ध आहे. यावरून राज्य आणि सरकार पुन्हा एकमेकांविरोधात ठाकल्याचे पाहायला मिळत आहे. रोहित पवार यांनी यातून मार्ग काढण्यासाठी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांना सल्ला दिला आहे. राज्याला एकत्रच ३-४ कोटी डोस उपलब्ध करून केंद्राने हा प्रश्न निकाली काढावा, असे रोहित पवार यांनी म्हटले आहे. 

भयंकर! जगातील २२ देशांमध्ये कोरोनाची तिसरी लाट; रुग्णसंख्या १३ कोटी ३० लाख

सरकारने वस्तुस्थिती मांडलीय

कोरोनाबाबत केंद्राच्या मार्गदर्शक तत्वानुसारच सरकार निर्णय घेत असताना केंद्रीय आरोग्यमंत्र्यांचं वक्तव्य ऐकून आश्चर्य वाटलं. लसीसंदर्भात राज्यातील विरोधक शांत असले तरी सरकारने वस्तुस्थिती मांडलीय. त्यामुळं राज्याला एकत्रच ३-४ कोटी डोस उपलब्ध करून केंद्राने हा प्रश्न निकाली काढावा, असे ट्विट रोहित पवार यांनी केले आहे. 

Sachin Vaze Letter: “ओ परिवार मंत्री... शपथ काय घेता, राजीनामा द्या आणि चौकशीला सामोरे जा”

लसींचा पूर्ण साठा पाठवून द्यावा

दुसऱ्या एका ट्विटमध्ये रोहित पवार म्हणाले की, नाहीतरी सध्या काही राज्यात निवडणूक सुरू असल्याने त्या संपेपर्यंत तिथला कोरोना शांत बसला आहे. त्यामुळं तिथं लसीची तेवढी गरज नाही. तोपर्यंत तरी देशाचा मोठा आर्थिक डोलारा सांभाळत असलेल्या महाराष्ट्राला केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन साहेबांनी लसींचा पूर्ण साठा पाठवून द्यावा, अशी विनंती रोहित पवार यांनी केली आहे. 

दरम्यान, देशात महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोना रुग्ण असतानाही लसीच्या पुरवठ्याबाबत दुजाभाव का कशासाठी? राज्यात आज केवळ साडेसात लाख लसीचे डोस पुरवण्यात आले. पण इतर राज्यांना ४० लाखांहून अधिक डोस देण्यात आले आहेत. यात राजकारणाचा मुद्दा नाही. पण ज्या पद्धतीने पुरवठा केला जात आहे ते योग्य नाही. दर आठवड्याला आम्हाला ४० लाख डोसेस द्या त्यापेक्षा अधिक आमची काहीच मागणी नाही, असे राजेश टोपे यांनी म्हटले आहे. 
 

Web Title: ncp rohit pawar react on corona vaccination drive in maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.