Rohit Pawar : "अचानक असं काय संकट आलं की तुम्हाला निष्ठा गहाण ठेवावी लागली, का पत्करली गुलामी?"

By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2023 12:20 PM2023-07-06T12:20:53+5:302023-07-06T12:31:26+5:30

NCP Rohit Pawar Slams Dilip Walse-Patil : राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार यांनी दिलीप वळसे पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे.

NCP Rohit Pawar Slams Dilip Walse-Patil Over maharashtra political crisis | Rohit Pawar : "अचानक असं काय संकट आलं की तुम्हाला निष्ठा गहाण ठेवावी लागली, का पत्करली गुलामी?"

Rohit Pawar : "अचानक असं काय संकट आलं की तुम्हाला निष्ठा गहाण ठेवावी लागली, का पत्करली गुलामी?"

googlenewsNext

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे कट्टर समर्थक तसेच मर्जीतले समजले जाणारे दिलीप वळसे पाटील यांनी शिंदे फडणवीस सरकारमध्ये सहभागी होत घेतलेली कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ हा अनेकांसाठी धक्का आहे. तालुक्यातील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते तसेच वळसे पाटील यांच्या जवळचे नेतेही याबाबत अनभिज्ञ होते. बातम्यामधून सर्वांना मंत्रिपद मिळाल्याची माहिती झाली. शरद पवार यांनी मुक संमती दिल्यानंतरच वळसे पाटील यांनी शपथ घेतली असेल अशीही चर्चा तालुक्यात रंगू लागली आहे.

राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार यांनी दिलीप वळसे पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे. "वळसे-पाटील साहेब तुम्ही स्वतःला तुमच्या या कृतीबद्दल माफ करू शकणार का?" असं म्हणत निशाणा साधला आहे. रोहित पवार यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. "अचानक असं काय संकट आलं की तुम्हाला आपली निष्ठा गहाण ठेवावी लागली. आपल्या विचारधारेला मूठमाती द्यावी लागली, हे महाराष्ट्राला जाणून घ्यायचंय" असं म्हणत रोहित पवार यांनी टीकास्त्र सोडलं आहे. 

"मा. वळसे-पाटील साहेब आदरणीय पवार साहेबांनी स्वतःच्या मुलाप्रमाणे जपलेला नेता म्हणून तुम्हाला महाराष्ट्र ओळखतो. तुमच्यावर तर साहेबांचा सर्वाधिक विश्वास होता. पण अचानक असं काय संकट आलं की तुम्हाला आपली निष्ठा गहाण ठेवावी लागली. आपल्या विचारधारेला मूठमाती द्यावी लागली, हे महाराष्ट्राला जाणून घ्यायचंय. केवळ सत्तेसाठी अशा प्रकारची बंडखोरी आपल्या सारख्या जेष्ठ नेत्याकडून अपेक्षित नव्हती. असो!"

"वळसे-पाटील साहेब तुम्ही स्वतःला या कृतीबद्दल माफ करू शकणार का?"

"प्रत्येक संकटावर मात करण्याची ताकद आमच्या #सह्याद्रीत आहे. सह्याद्रीच्या बाजूने संपूर्ण महाराष्ट्र उभा असून हा सह्याद्री नव्या जोमाने आणि नव्या ताकदीने उभा राहीलच, परंतु वळसे-पाटील साहेब तुम्ही स्वतःला तुमच्या या कृतीबद्दल माफ करू शकणार का?" असं रोहित पवार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. तसेच तुम्हाला_काय_केलं_होतं_कमी? आणि का_पत्करली_गुलामी? हे हॅशटॅग देखील वापरले आहेत. 

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार व वळसे पाटील यांचे संबंध संपूर्ण महाराष्ट्राला परिचित आहे. पवार यांचे स्वीय सहाय्यक म्हणून काम केल्यानंतर वळसे पाटील यांनी राजकारणात प्रवेश करून प्रथम विधानसभा निवडणूक लढवली. तेव्हापासून शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचा राजकीय आलेख चढता राहिला आहे. शरद पवार यांचे कट्टर समर्थक तसेच मर्जीतले म्हणून वळसे पाटील ओळखले जातात. तीन वर्षांपूर्वी जेव्हा अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत पहाटे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती. त्यावेळी पवार यांचे मन वळविण्यात वळसे पाटील यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. शरद पवार यांचे विश्वासू म्हणून वळसे पाटील यांनी अनेक ठिकाणी जबाबदारी पार पाडली आहे. राष्ट्रवादीतील पहिल्या फळीतील नेते म्हणून त्यांनी काम पाहिले आहे.मात्र आज त्यांनी शिंदे फडणवीस सरकारमध्ये कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतल्याने अनेकांना धक्का बसला आहे.
 

Web Title: NCP Rohit Pawar Slams Dilip Walse-Patil Over maharashtra political crisis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.