Maharashtra Politics: “आमदारांच्या चेहऱ्यावर अस्वस्थता, बॉडी लँग्वेज पडलेली; ही कोणत्या भूकंपाची चिन्ह असावीत?”

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2023 09:59 PM2023-02-15T21:59:35+5:302023-02-15T22:00:39+5:30

Maharashtra News: सत्ताधारी असूनही आमदारांना मुख्यमंत्र्यांना भेटता येत नाही. विशिष्ट पक्षाच्या फायली मंजूर होत असून त्याचा वेग अचानक वाढल्याचे समजले, असा दावा करण्यात आला आहे.

ncp rohit pawar tweet and ask what kind of earthquake are this supposed to be in maharashtra politics | Maharashtra Politics: “आमदारांच्या चेहऱ्यावर अस्वस्थता, बॉडी लँग्वेज पडलेली; ही कोणत्या भूकंपाची चिन्ह असावीत?”

Maharashtra Politics: “आमदारांच्या चेहऱ्यावर अस्वस्थता, बॉडी लँग्वेज पडलेली; ही कोणत्या भूकंपाची चिन्ह असावीत?”

googlenewsNext

Maharashtra Politics: महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सलग दुसऱ्या दिवशी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी घेण्यात आली. पहिल्या दिवशी ठाकरे गटाकडून युक्तिवाद करण्यात आला होता. यानंतर आता दुसऱ्या दिवशी शिंदे गटाकडून युक्तिवाद करण्यात करण्यात आला. दोन्ही बाजूच्या वकिलांनी कायद्यातील तरतुदींचा किस पाडत जोरदार युक्तिवाद केल्याचे सांगितले जात आहे. ठाकरे गटासह महाविकास आघाडीतील नेतेही शिंदे-फडणवीस सरकार पडण्याबाबत दावे करत आहेत. यातच आमदारांच्या चेहऱ्यावर अस्वस्थता, बॉडी लँग्वेज पडलेली, ही कोणत्या भूकंपाची चिन्ह असावीत, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. 

सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या सत्तासंघर्षाची सुनावणी पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाकडे राहणार की सात न्यायाधीशांच्या घटनापीठासमोर जाणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. यातच सलग तिसऱ्या दिवशीही राज्यातील सत्तासंघर्षावर सुनावणी होणार आहे. यातच महाविकास आघाडी आणि भाजप-शिंदे गटातील नेत्यांचे विविध मुद्द्यांवरून आरोप-प्रत्यारोप सुरूच असल्याचे दिसत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार रोहित पवार यांनी ट्विट करत एक प्रश्न उपस्थित केला आहे. 

ही कोणत्या भूकंपाची चिन्ह असावीत?

भूकंपापूर्वी प्राणी आणि पक्षांचे वर्तन बदलत असते.एकप्रकारे ती भूकंपाची पूर्वसूचनाच असते. असेच एक वेगळ्या प्रकारचे माझे निरीक्षण आहे. सत्ताधारी पक्षातील अनेक सहकारी आमदारांची कामानिमित्त मुंबईत असताना भेट झाली असता काही गोष्टी प्रकर्षाने जाणवल्या. या आमदारांच्या चेहऱ्यावर अस्वस्थता आणि बॉडी लँग्वेज पडलेली होती. सत्ताधारी असूनही काही आमदारांना मुख्यमंत्र्यांना भेटता येत नसल्याचे समजले. शिवाय अर्थ विभागातून विशिष्ट पक्षाच्याच फायली मंजूर होत असून त्याचा वेगही अचानक वाढल्याचे समजले. ही कोणत्या भूकंपाची चिन्हे असावीत? अशी विचारणा रोहित पवारांनी केली आहे. 

दरम्यान, आसामच्या मुख्यमंत्र्यांनी भीमाशंकर ज्योतिर्लिंगाबाबत केलेल्या दाव्यावर बोलताना, भीमाशंकरचे ज्योतिर्लिंग सहावे नसून ते आसाममध्ये असल्याचा अजब दावा आसामच्या मुख्यमंत्र्यांनी केला. त्यामुळे राज्यात बदला घेण्याचा कट आखण्यासाठी गुवाहाटीला जाऊन आसामच्या मुख्यमंत्र्यांचा पाहुणचार घेणारे या दाव्याचा कसा ‘बदला’ घेतात, याची महाराष्ट्र वाट पाहतोय, अशी टीका रोहित पवारांनी केली.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: ncp rohit pawar tweet and ask what kind of earthquake are this supposed to be in maharashtra politics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.