‘३५ मिसळ’ कल्पनेनंच कसंतरी झालं!; रोहित पवार यांचे मिश्कील टिप्पणी ट्वीट चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2022 11:53 AM2022-02-22T11:53:30+5:302022-02-22T11:53:49+5:30

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी ‘देवेंद्रांनी ३५ पुरणपोळ्या, पातेलंभर तुपात खाल्ल्या होत्या’, असे विधान केले होते. त्या विधानावरच रोहित पवार यांनी मिश्किल टिप्पणी केली असावी, अशी खमंग चर्चा मतदारसंघात सुरू होती. 

ncp rohit pawar tweet on devendra fadnavis amruta fadnavis tweet raosaheb danve bill paid | ‘३५ मिसळ’ कल्पनेनंच कसंतरी झालं!; रोहित पवार यांचे मिश्कील टिप्पणी ट्वीट चर्चेत

‘३५ मिसळ’ कल्पनेनंच कसंतरी झालं!; रोहित पवार यांचे मिश्कील टिप्पणी ट्वीट चर्चेत

Next

जामखेड (जि. अहमदनगर) : माहीजळगाव येथील हॉटेलमध्ये कार्यकर्त्यांसोबत मिसळ खाल्ली. एकाच मिसळमध्ये पोट भरल्याने ‘३५ मिसळ’ खाण्याच्या केवळ कल्पनेनेच कसंतरी झालं, असं गमतीदार ट्विट आमदार रोहित पवार यांनी सोमवारी केले. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी ‘देवेंद्रांनी ३५ पुरणपोळ्या, पातेलंभर तुपात खाल्ल्या होत्या’, असे विधान केले होते. त्या विधानावरच रोहित पवार यांनी मिश्किल टिप्पणी केली असावी, अशी खमंग चर्चा मतदारसंघात सुरू होती. 

एका खासगी दूरचित्रवाणी वाहिनीच्या कार्यक्रमात अमृता फडणवीस यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ‘३५ पुरणपोळ्या पातेलंभर तुपात खाल्ल्या होत्या’, असे विधान नुकतेच केले होते. त्यांच्या या विधानाची राज्यभर चर्चाही झाली होती. 

आमदार रोहित पवार हे सोमवारी सकाळी आठ वाजल्यापासूनच कर्जत तालुक्याच्या दौऱ्यावर होते. दुपारी दीड वाजता भूक लागल्याने कार्यकर्त्यांसमवेत त्यांनी माहीजळगाव येथील एका हॉटेलमध्ये मिसळ खाल्ली. त्यानंतर त्यांनी एक ट्विट केले. ‘मतदारसंघात असताना भूक लागल्याने माहीजळगावमधील हॉटेलमध्ये कार्यकर्त्यांसोबत मिसळ खाल्ली. एकाच मिसळमध्ये पोट भरल्याने ‘३५ मिसळ’ खाण्याच्या केवळ कल्पनेनंच कसंतरी झालं’, असे त्यांनी ट्विटमध्ये लिहिले. त्यानंतर रोहित यांनी अमृता यांना त्यातून टोला लगावल्याची चर्चा सुरू झाली आहे.

 
बिलही पेड केलंय... 
दिवा या रेल्वेमार्गाच्या लोकार्पण कार्यक्रमात केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्यासह भाजपचे नेते उपस्थित होते. यावेळी त्यांनी वडापाव खाल्ला. मात्र, बिल न देताच निघून गेले. याचे व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते. तोच धागा पकडून रोहित पवार यांनी मिसळ खाल्ल्यानंतर पैसे न देताच उठून गेलो नाही. तर नेहमीप्रमाणे बिलही पेड केलंय, असे ट्विटमध्ये पुढे म्हटले आहे.

Web Title: ncp rohit pawar tweet on devendra fadnavis amruta fadnavis tweet raosaheb danve bill paid

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.