Rohit Pawar : "सरकारचं अती होतंय! सत्याचा आवाज दाबता येत नाही म्हणून दुसऱ्या गुन्ह्यात गोवणं हा रडीचा डाव"

By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2022 01:39 PM2022-11-14T13:39:18+5:302022-11-14T13:50:40+5:30

NCP Rohit Pawar And Jitendra Awhad : राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे.

NCP Rohit Pawar tweet Over Jitendra Awhad case against mumbra police station | Rohit Pawar : "सरकारचं अती होतंय! सत्याचा आवाज दाबता येत नाही म्हणून दुसऱ्या गुन्ह्यात गोवणं हा रडीचा डाव"

Rohit Pawar : "सरकारचं अती होतंय! सत्याचा आवाज दाबता येत नाही म्हणून दुसऱ्या गुन्ह्यात गोवणं हा रडीचा डाव"

Next

जितेंद्र आव्हाड यांच्यावर अवघ्या दोनच दिवसांत आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे. एका महिलेने आव्हाड यांच्या विरोधात विनयभंगाची तक्रार दाखल केली आहे. मुंब्रा पोलिसांनी आव्हाड यांच्याविरोधात कलम ३५४ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. यानंतर आता या घडलेल्या प्रकारावर विविध प्रतिक्रिया देण्यात आल्या आहेत. राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार यांनी देखील यावर आता भाष्य केलं आहे. "सत्याचा आवाज दाबता येत नाही म्हणून दुसऱ्या गुन्ह्यात गोवणं हा रडीचा डाव आहे" असं म्हटलं आहे. 

रोहित पवार (NCP Rohit Pawar) यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. "सरकारचं आता अति होतंय! एकदा प्रयत्न करून बघितला पण सत्याचा आवाज दाबता येत नाही म्हणून दुसऱ्या गुन्ह्यात गोवणं हा रडीचा डाव आहे! तक्रारदाराची राजकिय पार्श्वभूमी आणि तो व्हिडिओ बघितला तर कोणतीही महिला भगिनी सांगेन की, सत्य काय आहे?" असं रोहित पवार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. 

"'छोटे मन से कोई बड़ा नहीं होता, टूटे मन से कोई खड़ा नहीं होता', स्व. अटलजींच्या या ओळी सत्याचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करणारे नक्कीच लक्षात घेतील" असं देखील रोहित पवार यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. जितेंद्र आव्हाड यांच्या पत्नी ऋता यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. "जे काही घडलं ती Spontaneous Reaction होती. त्याला विनयभंग म्हणता येत नाही" असं म्हटलं आहे. ऋता यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. 

 "...त्याला विनयभंग म्हणता येत नाही"; जितेंद्र आव्हाडांच्या बचावासाठी पत्नी मैदानात

"ज्या महिलेने ही तक्रार दाखल केली आहे, त्यांच्याकडे मोटीव्ह आहे. छट पुजेवरून झालेल्या बाचाबाचीत रीदा रशिद यांच्यावर अनेक गुन्हे दाखल असून त्या जामिनावर आहेत. NCP व आव्हाडांविरोधात आक्षेपार्ह बोलल्या आहेत" असं ट्विटमध्ये म्हटलं आहे. "अंगावर धडकणाऱ्या व्यक्तिला बाजूला करणे गुन्हा असेल तर बाजारात, ट्रेन मध्ये, रेल्वे पुलावर, गर्दीमध्ये रोज शेकडोंनी ‘विनयभंग’ होत असतील. रीदा रशिद ह्या राजकारणी महत्वाकांक्षा बाळगतात आणि काल रात्री त्या कुणाला तरी भेटल्या. त्यांच्यावर पण एट्रोसिटीचा गुन्हा दाखल झाला आहे. जे काही घडलं ती spontaneous reaction होती. त्याला विनयभंग म्हणतां येत नाही" असं देखील ऋता यांनी म्हटलं आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: NCP Rohit Pawar tweet Over Jitendra Awhad case against mumbra police station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.