Ram Mandir Bhumi Pujan : "राम सगळ्यांचा असण्यातच 'राम' आहे, विचार घेऊन माणुसकीचा सेतू बांधूया"

By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2020 11:53 AM2020-08-05T11:53:56+5:302020-08-05T12:02:03+5:30

Ram Mandir Bhumi Pujan : नरेंद्र मोदी राम मंदिराच्या भूमिपूजनानंतर देशाला संबोधित करणार असल्याची माहिती मिळत आहे. याच दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी एक ट्विट केलं आहे. 

ncp rohit pawar tweet on Ram Mandir Bhumi Pujan | Ram Mandir Bhumi Pujan : "राम सगळ्यांचा असण्यातच 'राम' आहे, विचार घेऊन माणुसकीचा सेतू बांधूया"

Ram Mandir Bhumi Pujan : "राम सगळ्यांचा असण्यातच 'राम' आहे, विचार घेऊन माणुसकीचा सेतू बांधूया"

googlenewsNext

मुंबई - राम मंदिराच्या भूमिपूजनासाठी अयोध्या नगरी सजली आहे.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत राम मंदिराचा भूमिपूजन सोहळा होणार असून अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आरएसएसचे प्रमुख मोहन भागवत हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहतील. नरेंद्र मोदी राम मंदिराच्या भूमिपूजनानंतर देशाला संबोधित करणार असल्याची माहिती मिळत आहे. याच दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी एक ट्विट केलं आहे. 

राम सगळ्यांचा असण्यातच 'राम' आहे असं म्हणत रोहित पवार यांनी रामनामाचा महिमा सांगितला आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून त्यांनी याबाबत एक ट्विट केलं आहे. 'राम आपला एकट्याचा नव्हता, तर तो सगळ्यांचा होता आणि राहणार. राम सगळ्यांचा असण्यातच राम आहे. रामाने राम सेतू बांधला आपण प्रभू श्रीरामाचे विचार घेऊन माणुसकीचा सेतू बांधूया. आजच्या या दिवशी श्रीरामाला एकच प्रार्थना, सबकों सन्मती दे भगवान!' असं रोहित यांनी म्हटलं आहे. 

"रामप्रहरापासून आपला दिवस सुरू होतो. जय जय राम कृष्ण हरी हा जगण्याचा मंत्र असतो. रामराम ही एकमेकांच्या ओळखीची खुण असते. साने गुरूजी म्हणायचे, 'रामराम म्हणताना तू ही राम आणि मी ही राम हे अपेक्षित असतं'. आपण पिढ्यान् पिढ्या असेच वागत आलो आहोत. राम आपला एकट्याचा नव्हता, तर तो सगळ्यांचा होता आणि राहणार. शेवटचा श्वास घेताना राम म्हणणाऱ्या गांधींजींचा राम, वारकऱ्यांना सामाजिक समता शिकवणारे ज्ञानदेव तुकाराम. आपल्याच शेतात अयोध्या समजून शेतात राबणारा एखादा सखाराम. राम सगळ्यांचा असण्यातच राम आहे" असं ट्विट त्यांनी केलं आहे.

"रामाने राम सेतू बांधला आपण प्रभू श्रीरामाचे विचार घेऊन माणुसकीचा सेतू बांधूया. जाती धर्माच्या बाबतीत भल्या भल्या पुरुषांच्या मर्यादा दिसून येतात निदान मर्यादापुरुषोत्तम रामाच्या बाबतीत असं होऊ नये. आजच्या या दिवशी श्रीरामाला एकच प्रार्थना, सबकों सन्मती दे भगवान!!!रामकृष्णहरी" असं देखील रोहित पवार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी शहर पूर्णपणे भगव्या रंगात सजले आहे. जागोजागी प्रभू रामचंद्राच्या प्रतिमा असलेले फलक लावण्यात आले आहेत. शहरात कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Ram Mandir Bhumi Pujan : राम मंदिर भूमिपूजनाची आठवण म्हणून निमंत्रिताना मिळणार 'ही' खास भेट

Mumbai Rain Updates : सलग दुसऱ्या दिवशी मुंबईत पावसाची जोरदार बॅटींग; रस्ते वाहतुकीला फटका

Ram Mandir Bhumi Pujan : "आजचा दिवस ऐतिहासिक, राम मंदिरामुळे देशात 'रामराज्य' येणार"

Ram Mandir Bhumi Pujan : राम मंदिराच्या भूमिपूजनानंतर मोदी देशाला संबोधित करणार, असा असेल संपूर्ण कार्यक्रम

CoronaVirus News : लय भारी! फक्त 30 सेकंदांत आवाजावरून समजणार कोरोना आहे की नाही?, जाणून घ्या कसं

CoronaVirus News : लढ्याला यश! Jubilant ने लाँच केलं कोरोनावरचं औषध, जाणून घ्या किंमत अन् बरंच काही...

Web Title: ncp rohit pawar tweet on Ram Mandir Bhumi Pujan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.