CoronaVirus: “घरात नाही दाणा, पण मला ‘व्हॅक्सिन गुरू’ म्हणा”; राष्ट्रवादीची केंद्रावर टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2021 03:09 PM2021-05-17T15:09:40+5:302021-05-17T15:11:15+5:30

CoronaVirus: पंतप्रधान मोदी आणि केंद्र सरकारवर सातत्याने टीका केली जात आहे.

ncp rupali chakankar criticised modi govt over corona vaccine shortage | CoronaVirus: “घरात नाही दाणा, पण मला ‘व्हॅक्सिन गुरू’ म्हणा”; राष्ट्रवादीची केंद्रावर टीका

CoronaVirus: “घरात नाही दाणा, पण मला ‘व्हॅक्सिन गुरू’ म्हणा”; राष्ट्रवादीची केंद्रावर टीका

Next
ठळक मुद्देराष्ट्रवादी नेत्या रुपाली चाकणकर यांचे ट्विटघरात नाही दाणा, पण मला ‘व्हॅक्सिन गुरू’ म्हणाकेंद्र सरकार आणि पंतप्रधान मोदींवर टीकास्त्र

मुंबई: गेल्या काही दिवासांपासून मुंबई, ठाणे, पुणेसह संपूर्ण महाराष्ट्रात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा मोठा परिणाम झाल्याचे पाहायला मिळत आहे. कोरोनाच्या वाढत्या उद्रेकामुळे कोरोना लस, ऑक्सिजन, रेमडेसिवीर इंजेक्शन, बेड्स यांचा तुटवडा जाणवत आहे. या पार्श्वभूमीवर राज्य आणि केंद्र सरकारांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. पंतप्रधान मोदी आणि केंद्र सरकारवर सातत्याने टीका केली जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून पुन्हा एकदा केंद्राला टोला लगावण्यात आला आहे. (ncp rupali chakankar criticised modi govt over corona vaccine shortage)

राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी ट्विट करत केंद्रातील मोदी सरकारवर कोरोना लसींच्या तुटवड्यावरून टीका केली आहे. चाकणकर यांनी एक पोस्ट केली असून, व्हिडिओ शेअर केला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सातत्याने केंद्राच्या धोरणांविरोधात काँग्रेस, राष्ट्रवादी आणि अन्य विरोधी पक्षांकडून पंतप्रधान मोदींवर टीका होताना दिसत आहे. 

अरेरे! घरात विलगीकरणासाठी जागा नाही; पठ्ठ्याने झाडावर काढले तब्बल ११ दिवस

घरात नाही दाणा, पण मला ‘व्हॅक्सिन गुरू’ म्हणा

घरात नाही दाणा, पण मला ‘व्हॅक्सिन गुरू’ म्हणा. भारतीय नागरिकांना लसीकरणापासून वंचित ठेवून केंद्र सरकारने जगभरात या लसी फुकट वाटल्या. केंद्र सरकारच्या पापाचं फळ जनतेला भोगावं लागत आहे. या पापाचं प्रायश्चित्त भाजपला करावंच लागेल, असे रुपाली चाकणकर यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. 

विदेशात अधिक कोरोनाच्या लसी

राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनीही लसीकरणावरून केंद्र सरकारवर टीका केली. दाओसमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आम्ही लसगुरु बनल्याचे जाहीर केले होते. यूएनमधील भारतीय दुतावासाने सांगितले की, जितके लसीकरण भारतात झाले नाही त्यापेक्षा जास्त लस विदेशात पाठवण्यात आली आहे. आता केंद्रसरकार मात्र एक कोटी पाठविल्याचे सांगत आहे. तर काहीजण पाच कोटी कंपल्सरी पाठवायच्या होत्या म्हणून पाठवल्याचे बोलत आहेत. जेव्हा देशात लस उपलब्ध होत नाहीय तेव्हाच प्रश्न उपस्थित केले जात असल्याचे मलिक म्हणाले.

लॉकडाऊनचे नियम मोडणाऱ्यांवर अनोखी कारवाई; ४० मिनिटे रामनाम लिहिण्याची शिक्षा

दरम्यान, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार देशात गेल्या २४ तासांत २ लाख ८१ हजार ३८६ नवीन कोरोनाबाधित आढळून आले असून, ३ लाख ७८ हजार ७४१ जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर, याच कालावधीत ४ हजार १०६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच आतापर्यंत १८ कोटी २९ लाख २६ हजार ४६० जणांना कोरोनाची लस देण्यात आली आहे. 
 

Web Title: ncp rupali chakankar criticised modi govt over corona vaccine shortage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.