Rupali Chakankar : "काही गोष्टी फोटोत कैद झाल्यानंतर जगासमोर येतात, अनुभवाचे बोल"; रुपाली चाकणकरांचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2023 12:30 PM2023-07-09T12:30:24+5:302023-07-09T12:39:53+5:30

NCP Rupali Chakankar And Supriya Sule : रुपाली चाकणकर यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून एक फोटो रिट्वीट केला आहे.

NCP Rupali Chakankar Shared Supriya Sule and rahul gandhi Photo | Rupali Chakankar : "काही गोष्टी फोटोत कैद झाल्यानंतर जगासमोर येतात, अनुभवाचे बोल"; रुपाली चाकणकरांचा टोला

Rupali Chakankar : "काही गोष्टी फोटोत कैद झाल्यानंतर जगासमोर येतात, अनुभवाचे बोल"; रुपाली चाकणकरांचा टोला

googlenewsNext

महाराष्ट्राच्या राजकारणातराष्ट्रवादी काँग्रेसमध्ये भूकंप झाला. अजित पवार ४० पेक्षा जास्त आमदारांना सोबत घेऊन शरद पवारांना सोडून पुढे निघाले. त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये प्रवेश केला. तसेच, खरी राष्ट्रवादी आमचीच असा दावाही केला. त्यानंतर अजित पवार गटाचा मेळावा झाला. त्यात महिला अध्यक्ष म्हणून रूपाली चाकणकर यांनी आपली रोखठोक मतं मांडली. त्याच वेळी, त्यांनी पक्षातील अंतर्गत राजकारण, पदनियुक्त्या आणि त्यांच्या मनात असलेली सल बोलून दाखवली होती. 

रुपाली चाकणकर यांनी आता आपल्या ट्विटर अकाऊंटवरून एक फोटो रिट्वीट केला आहे. या फोटोमध्ये युवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया दुहान या काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची भेट घेताना दिसत आहेत. तिथे सुप्रिया सुळे देखील उपस्थित असल्याचं पाहायला मिळत आहे. यासोबतच रुपाली चाकणकर यांनी "काही गोष्टी फोटोत कैद झाल्यानंतर जगासमोर येतात" असं कॅप्शन दिलं आहे. तसेच अनुभवाचे बोल हा हॅशटॅग देखील यावेळी  वापरला आहे. 

युवराज नावाच्या एका ट्विटर युजरने हा फोटो ट्वीट केला आहे. "या फोटोत एका नेत्याचा विनम्र भाव दिसतो पण फोटो झुम केल्यास एका नेत्याची प्रचंड असुरक्षितता देखील पाहायला मिळते. नवे नेतृत्व घडले पाहिजे यासाठी आयुष्यभर झगडणारे साहेब कुठे आणि या कुठे" असं देखील युजरने कॅप्शनमध्ये म्हटलं आहे. हाच फोटो रुपाली चाकणकर यांनी रिट्विट करून टोला लगावला आहे. 

रूपाली चाकणकर यांनी "मनगटाच्या ताकदीइतकाच रोखठोक निर्णय घेणारे अजित पवार यांच्या मंचावर मी पहिल्यांदाच महिला अध्यक्ष म्हणून भाषण करत आहे. 'तुझीच सांथसंगत हवी, आपलंच आभाळ आपली धरती... चालत राहू असेच सारे, वादळ घेऊन खांद्यावरती' अशी आम्हा सर्वांची भावना आहे. दादा, आम्ही तुमच्या विकासाच्या निर्णयाच्या सोबत आहोत. आपल्याकडे आलो आणि काम झालं नाही कधीही कार्यकर्त्यांचं होत नाही. सांगतो, बघतो असं कधीही होत नाही. इथला प्रत्येक कार्यकर्ता दादांकडून ऊर्जा घेऊन जाणार आहे. वादळ असो किंवा कोरोना असो, महाराष्ट्राचा माणूस एकत्र लढतो. कोरोनामध्ये अजितदादा एकटे असे मंत्री होते जे मंत्रालयापासून सर्व ठिकाणी सर्वत्र जनतेसाठी उपस्थित होतात", असे स्पष्टपणे सांगितले.
 

Web Title: NCP Rupali Chakankar Shared Supriya Sule and rahul gandhi Photo

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.