Sharad Pawar: “मेहनत करा, पण मार्क पाहू नका”; शरद पवारांना किती टक्के गुण मिळायचे?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2023 05:41 PM2023-03-04T17:41:15+5:302023-03-04T17:43:10+5:30

Sharad Pawar: कमी मार्क मिळाले म्हणून चिंता करु नका, असे शरद पवार यांनी म्हटले आहे.

ncp sharad pawar give suggestions to students | Sharad Pawar: “मेहनत करा, पण मार्क पाहू नका”; शरद पवारांना किती टक्के गुण मिळायचे?

Sharad Pawar: “मेहनत करा, पण मार्क पाहू नका”; शरद पवारांना किती टक्के गुण मिळायचे?

googlenewsNext

Sharad Pawar: राज्यासह देशात शरद पवार यांचा मोठा दबदबा आहे. राजकीय वर्तुळात घडणाऱ्या अनेक घटनांवर शरद पवार थेटपणे भाष्य करत असतात. शरद पवारांचे मत राजकीय वर्तुळात महत्त्वाचे मानले जाते. यातच एका मुलाखतीत बोलताना शरद पवार यांनी मुलांना सल्ला दिला आहे.  कमी मार्क मिळाले म्हणून चिंता करु नका. मेहनत करा, असे शरद पवार यांनी म्हटले आहे. 

या मुलाखतीत बोलताना शरद पवार यांनी आपल्या जीवनातील अनेक पैलू उघड केले. मी कधी नापास झालो नाही. पण ३५ टक्क्यांच्या पुढेही गेलो नाही. नेहमी मार्ग काढण्याची मानसिकता ठेवली. संकटातून मार्ग काढण्याची मानसिकता असली की अपयश येत नाही. यामुळे शैक्षणिक क्षेत्रात कष्ट करा. पण कमी मार्क मिळाले म्हणून चिंता करु नका. फार चांगले गुण मिळाले तो विद्यार्थी यशस्वी होतो, असे नाही. ३५ टक्के गुण मिळवणारा विद्यार्थीही यश मिळवतो हे मी अनुभवले आहे. म्हणून मेहनत करा, पण मार्क पाहू नका, असे शरद पवार यांनी सांगितले. 

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे अध्यक्षपद सांभाळले

क्रिकेटमध्ये कसे गेले, त्यावर बोलताना शरद पवार म्हणाले की, माझे सासरे सदूराव शिंदे भारतीय संघातील खेळाडू. ते गुगली बॉलर होते. त्यामुळे माझ्या लग्नात अनेक क्रिकेटपटू आले होते. त्यानंतर या सर्व खेळाडूंशी जवळीक निर्माण झाली. मग मी गरवारे क्लबचा अध्यक्ष झालो. त्यावेळी क्लबमध्ये काहीवाद होते.ते मिटत नव्हते. हे वाद मिटवायचा प्रयत्न केला. गरवारे क्लबनंतर मुंबई क्रिकेटची निवडणूक लढवली. पुढे जाऊन भारतीय क्रिकेट मंडळ म्हणजे बीसीसीआयचा अध्यक्ष झालो. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे अध्यक्षपद सांभाळले. त्यानंतर मी क्रिकेटचा राजीनामा दिला. तेव्हापासून परत तिकडे पाहिले नाही, असे शरद पवारांनी स्पष्टपणे सांगितले. 

दरम्यान, शरद पवार यांनी पावसातली सभेची आठवण सांगितली. साताऱ्याच्या सभेचे श्रेय माझ्याकडे नाही. मी बोलायला उभे राहिलो पाऊस आला. मला वाटले आता सभा संपली. पण लोकांनी खुर्च्या डोक्यावर घेतल्या. तेव्हा माझ्या लक्षात आले की, लोकांना ऐकायचेय. मग मी बोलत राहिलो. लोकांनी ऐकले. अन् आमचा उमेदवारही निवडून दिला. त्या सभेचा व्हिडिओ सर्वत्र फिरले. राज्यभरातून त्याचे कौतुक झाले. ती सभा ऐतिहासिक ठरली होती, असे शरद पवार यांनी सांगितले. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: ncp sharad pawar give suggestions to students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.