“सेमिस्टरला नापास झालो, पण फायनलला तसेच होईल असे काही नाही”; सुप्रिया सुळेंचे सूचक विधान

By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2023 08:46 PM2023-12-10T20:46:40+5:302023-12-10T20:49:27+5:30

Supriya Sule:आता चार राज्य हरलो. म्हणून त्यातच रमत बसायचे नाही. एप्रिलमध्ये पुन्हा परीक्षा आहे, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.

ncp sharad pawar group mp supriya sule reaction on lok sabha election 2024 | “सेमिस्टरला नापास झालो, पण फायनलला तसेच होईल असे काही नाही”; सुप्रिया सुळेंचे सूचक विधान

“सेमिस्टरला नापास झालो, पण फायनलला तसेच होईल असे काही नाही”; सुप्रिया सुळेंचे सूचक विधान

Supriya Sule: देशभरातील पाच राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांपैकी तीन राज्यांत भाजपने जोरदार बाजी मारली. तर, छत्तीसगड आणि राजस्थान ही दोन राज्ये काँग्रेसच्या हातातून गेली. यानंतर आता आगामी लोकसभा निवडणुकीवर सर्वच पक्षांनी लक्ष केंद्रीत केले आहे. इंडिया आघाडीची होणारी बैठक पुढे ढकलण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर, सेमिस्टरला नापास झालो, पण फायनलला तसेच होईल असे काही नाही, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे. 

एका कार्यक्रमात बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, माझा सध्या सर्वाधिक वेळ फोकस कामातून इतर कामात जातो. माझा वकिलांशी कधी संबंध आला नव्हता. मराठी माणसाच्या संस्कार असतात. शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये. ते इतक्या वेळा बिंबवलेले असते. त्यामुळे मी पहिल्यांदा सर्वोच्च न्यायालयाची पायरी चढले तेव्हा मला माझी आज्जीच दिसली. पण आता मी पायरी चढले, आता माझ्याकडे उतरण्याचा मार्गच नाही. पण या गोष्टी होत असतात, असे सुप्रिया सुळे यांनी सांगितले.

या सहा महिन्यातही सगळे चांगलेच होणार आहे

आता चार राज्य हरलो. म्हणून त्यातच रमत बसायचे नाही. आता कपडे झटकून पुन्हा कामाला लागायचे. लोकसभा निवडणुकीसाठी सहाच महिने उरले आहेत. या सहा महिन्यातही सगळे चांगलेच होणार आहे. सेमिस्टरला नापास झालो म्हणून फायनलला नापास होऊ असे काही नसते. अभ्यास नीट केला तर फर्स्टक्लासमध्येही पास होऊ, काही सांगता येणार नाही, असे सूचक विधान सुप्रिया सुळे यांनी केले.

दरम्यान, यशाला अनेक भागीदार असतात, पण अपयश एकटेच असते असे म्हणतात. आमच्या आयुष्यातील सर्वांत मोठे अपयश मागच्याच आठवड्यात आलेले आहे. आम्ही दुःखी आहोत. एकमेकांवर आरोप होत आहेत. पण झाले तर आहेच ना. आता त्यात किती आपण रमत बसणार? एप्रिलमध्ये पुन्हा परीक्षा आहे, असा निर्धार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केला.
 

Web Title: ncp sharad pawar group mp supriya sule reaction on lok sabha election 2024

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.