Sharad Pawar: “...तर राज ठाकरे यांना सुरक्षा पुरवण्यास हरकत नाही”; शरद पवार यांनी स्पष्टच सांगितले

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2022 09:42 PM2022-04-19T21:42:20+5:302022-04-19T21:43:27+5:30

Sharad Pawar: राज ठाकरे अयोध्येला जाऊ शकतात. हा त्यांचा अधिकार आहे, असे शरद पवार यांनी म्हटले आहे.

ncp sharad pawar reaction over mns raj thackeray ayodhya visit and centre govt to provide security | Sharad Pawar: “...तर राज ठाकरे यांना सुरक्षा पुरवण्यास हरकत नाही”; शरद पवार यांनी स्पष्टच सांगितले

Sharad Pawar: “...तर राज ठाकरे यांना सुरक्षा पुरवण्यास हरकत नाही”; शरद पवार यांनी स्पष्टच सांगितले

googlenewsNext

मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मशिदींवरील भोंग्यांसंदर्भात ठाम भूमिका घेतली आहे. महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारला ३ मेपर्यंत भोंगे उतरवण्याचे अल्टिमेटमही दिले आहे. यावरून अद्याप राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहेत. यातच आता राज ठाकरे यांना धमक्या मिळत असल्याचा दावा करण्यात आला असून, यासंदर्भात त्यांना ‘झेड प्लस’ सुरक्षा देण्यात यावी, अशी मागणी मनसेने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) केली आहे. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांना केंद्राकडून सुरक्षा पुरविली जाणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. या एकूणच प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी भाष्य केले. राज ठाकरे यांना सुरक्षा पुरवण्यास हरकत नसल्याचे शरद पवार यांनी म्हटले आहे. 

मनसेच्या पाडव्या मेळाव्यात आणि उत्तर सभेत राज ठाकरे यांनी शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली होती. राष्ट्रवादी काँग्रेसमुळे जातीय द्वेष पसरत गेला, असा मोठा आरोपही राज ठाकरे यांनी केला होता. यासह अनेक मुद्द्यांवरून राज ठाकरे यांनी शरद पवारांवर हल्लाबोल केला होता. यानंतर राष्ट्रवादीसह महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांनी राज ठाकरे यांच्यावर शेलक्या शब्दांत पलटवार केला. यातच शरद पवार यांना राज ठाकरे यांना केंद्राकडून सुरक्षा देण्याबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. 

राज ठाकरे यांना सुरक्षा पुरवण्यास हरकत नाही

शरद पवार कर्नाटक दौऱ्यावर होते. राज ठाकरे यांना सुरक्षा देण्यासंबंधी सुरु असलेल्या चर्चेवर ते म्हणाले की, राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा हा त्यांच्या पक्षाचा कार्यक्रम असेल तर ते अयोध्येला जाऊ शकतात, हा त्यांचा अधिकार आहे, त्यांच्या जीवाला धोका असेल तर त्यांना सुरक्षा पुरवण्यास हरकत नाही. तसेच ज्या राज्यांमध्ये आमची शक्ती कमी आहे, त्यापैकी कर्नाटक एक राज्य आहे. येथे जास्त लक्ष द्यावे यादृष्टीने सुरुवात केली आहे. मी आणि माझे सहकारी वर्षभर दौरे करत या ठिकाणी पक्षाचे काम वाढवतील, असे शरद पवार म्हणाले. ते टीव्ही९शी बोलत होते. 

दरम्यान, देशात सांप्रदायिक स्थिती निर्माण कऱण्याचा प्रयत्न भाजप आणि त्यांच्या सहाकऱ्यांच्या वतीने होत आहे. त्याबद्दल लोकांमध्ये जनजागृती करत आहोत. यासोबतच काही राष्ट्रीय प्रश्न आहेत. जसे सांप्रदायिक विचार वाढणे चिंताजनक आहे त्याप्रमाणे पेट्रोल, डिझेल, गॅस यांच्या किंमती सामान्य माणासाला त्रासदायक आहे. त्यावरही बोलावे अशी आमची मागणी आहे, असे शरद पवार यांनी म्हटले आहे. 
 

Web Title: ncp sharad pawar reaction over mns raj thackeray ayodhya visit and centre govt to provide security

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.