मनोज जरांगेंचे पुन्हा उपोषण; प्रफुल्ल पटेल म्हणाले, “मराठा आरक्षणाला विरोध नाही, पण...”

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2024 05:37 PM2024-09-17T17:37:05+5:302024-09-17T17:38:29+5:30

NCP Ajit Pawar Group Praful Patel News: आमचे कुठलेली आमदार नाराज नाही. आम्हाला आता लोकांपर्यंत जायचे आहे, असे प्रफुल्ल पटेल यांनी म्हटले आहे.

ncp sp group ajit pawar reaction over maratha reservation and mahayuti seat sharing of maharashtra assembly election 2024 | मनोज जरांगेंचे पुन्हा उपोषण; प्रफुल्ल पटेल म्हणाले, “मराठा आरक्षणाला विरोध नाही, पण...”

मनोज जरांगेंचे पुन्हा उपोषण; प्रफुल्ल पटेल म्हणाले, “मराठा आरक्षणाला विरोध नाही, पण...”

NCP Ajit Pawar Group Praful Patel News: मी जीवघेणा प्रवास सुरू केला आहे, तुम्ही आरक्षण नाही दिले ना, मग तुमचे बारा-तेरा वाजल्याशिवाय सोडणार नाही. माझ्या नावाने नंतर बोंबलायचे नाही. मराठ्यांचे पोरे सोपे नाही. २०२४ ला तुमचा भुगा करणार, असा इशारा देत मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी उपोषणाला सुरूवात केली आहे. सगेसोयरे कायद्याची अंमलबजावणी व्हावी, मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळावे, या मागणीसाठी मनोज जरांगे यांचे मुक्तीसंग्राम दिनी सहावे उपोषण आहे. यासंदर्भात राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया उमटत आहेत. मराठा आरक्षणाला विरोध नाही, असे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी म्हटले आहे. 

मीडियाशी बोलताना प्रफुल्ल पटेल म्हणाले की, मला कोणाच्या वादावादीमध्ये पडायचे नाही, मात्र मराठा आरक्षणाला कुठल्याही राजकीय पक्षाचा विरोध नाही. महाराष्ट्र विधानसभेने मराठा सामाजाला आरक्षण दिले आहे. काही गोष्टी तांत्रिकही असतात तरी देखील सरकार या बाबीला प्रामाणिकपणे या मागणीला पाठिंबा देत आहे. आंदोलन करणे त्यांचा अधिकार आहे मात्र चर्चा करून यावर मार्ग काढता येऊ शकतो, असे प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले.

आमचे कुठलेली आमदार नाराज नाही

आमचे कुठलेली आमदार नाराज नाही. आम्हाला आता लोकांपर्यंत जायचे आहे, त्यांचा आशीर्वाद मागायचा आहे. हे सगळे विषय बाजूलाच केलेले बरे, सगळ्यांना आपापल्या मतदारसंघांमध्ये काम करून लोकांच्या विश्वास जिंकला केला पाहिजे. विधानसभा जागावाटपावर अद्याप तिन्ही पक्षांमध्ये कुठलीही अधिकृत चर्चा झालेली नाही. एक-दोन दिवसांमध्ये बैठका होणार असून महायुती म्हणून आम्ही एकत्र लढणार आहोत. आमच्यात कुठलेही मतभेद नाहीत तसेच आमचे सरकार पुन्हा आली तर आम्ही नागरिकांना आणखी चांगल्या योजना देऊ, असे प्रफुल्ल पटेल म्हणाले. 

दरम्यान, जनसन्मान यात्रेनिमित्त नागरिकांच्या व सामान्य मतदारांचा सन्मान झाला पाहिजे. सरकारने जन सामान्यांसाठी ज्या चांगल्या योजना दिल्या आहेत, त्यांची माहिती असली पाहिजे आणि राजकीय पक्ष म्हणून लोकांपर्यंत पोहचणे ही आमची जबाबदारी आहे, असे प्रफुल्ल पटेल म्हणाले.
 

Web Title: ncp sp group ajit pawar reaction over maratha reservation and mahayuti seat sharing of maharashtra assembly election 2024

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.