शरद पवार गटाचे स्टार प्रचारक जाहीर; जयंत पाटील, अमोल कोल्हे, रोहित पवारांसह ४० जणांचा समावेश
By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2024 01:03 PM2024-04-02T13:03:49+5:302024-04-02T13:08:00+5:30
Lok Sabha Elections 2024: राज्यात लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला जोर आल्याचे दिसून येत आहे.
मुंबई : देशासह राज्यात लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. आज शरद पवार यांच्या पक्षाने लोकसभा निवडणुकीसाठी स्टार प्रचारकांची यादी निवडणूक आयोगाकडे सादर केली. यामध्ये पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह ४० प्रचारकांच्या नावांचा यामध्ये समावेश आहे.
राज्यात लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला जोर आल्याचे दिसून येत आहे. अनेक राजकीय घडामोडींना वेग आला असून स्टार प्रचारकांसाठी सभास्थळांचे बुकिंग सुरू झाले. यातच आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने लोकसभेच्या स्टार प्रचारकांची यादी निवडणूक आयोगाकडे सादर केली. या यादीमध्ये शरद पवार, सुप्रिया सुळे, जयंत पाटील, अमोल कोल्हे, जितेंद्र आव्हाड, अनिल देशमुख, रोहित पवार, सोनिया दुहान, पूजा मोरे यांच्यासह ४० नेत्यांचा समावेश आहे.
NCP-SCP issues a list of 40 star campaigners of the party for the upcoming Lok Sabha elections.
— ANI (@ANI) April 2, 2024
Party chief Shard Pawar, Supriya Sule, Jayant Patil, Anil Deshmukh, Jitendra Awhad, Rohit Pawar among the campaigners. pic.twitter.com/RSkRhT085e
शरद पवार गटाकडून आतापर्यंत पाच उमेदवार जाहीर...
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून लोकसभा निवडणुकीसाठी आतापर्यंत पाच उमेदवार जाहीर केले आहेत. यामध्ये बारामतीतून सुप्रिया सुळे, शिरुरमधून अमोल कोल्हे, अहमदनगरमधून निलेश लंके, वर्ध्यातून अमर काळे आणि दिंडोरीमधून भास्करराव भगरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तसेच माढा आणि सातारा लोकसभेचे उमेदवार अद्याप जाहीर झाले नाहीत.