पराभूत झालो असलो तरी...; विधानसभा निकालानंतर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2024 09:08 AM2024-11-25T09:08:30+5:302024-11-25T09:09:36+5:30

आत्मपरीक्षण करू आणि सक्षम महाराष्ट्र उभा करण्यासाठी प्रामाणिकपणे लढत राहू, असा निर्धार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केला आहे.

ncp Supriya Sule first reaction after the Maharashtra assembly vidhan sabha election result 2024 | पराभूत झालो असलो तरी...; विधानसभा निकालानंतर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया

पराभूत झालो असलो तरी...; विधानसभा निकालानंतर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया

NCP Supriya Sule ( Marathi News ) : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षांच्या महायुतीने दमदार विजय मिळवत महाविकास आघाडीचा दारुण पराभव केला. या पराभवानंतर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी जनतेचा कौल मान्य असल्याचं सांगत आम्ही आत्मपरीक्षण करू आणि सक्षम महाराष्ट्र उभा करण्यासाठी प्रामाणिकपणे लढत राहू, असा निर्धार व्यक्त केला आहे.

सुप्रिया सुळे म्हणाल्या की, "विधानसभा निवडणुकीत मायबाप जनतेने जो कौल दिला तो अतिशय नम्रपणे आम्ही स्वीकारत आहोत. या निकालातून बोध घेऊन नक्कीच आत्मपरीक्षण करू आणि भविष्यातील सक्षम महाराष्ट्र उभा करण्यासाठी प्रामाणिकपणे लढत राहू. शेतकरी, कष्टकरी,महिला, तरुण व समाजातील प्रत्येक घटकांच्या हक्काची व स्वाभिमानाची लढाई आम्ही खंबीरपणे कायम लढत राहू. आता जरी आम्ही पराभूत झालो असलो तरी आपल्या मूल्यांसाठी प्रांजळपणे काम करत राहू आणि शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांची ही पालखी निष्ठेने, सर्व शक्तीनिशी पुढे नेऊ," अशी भूमिका सुळे यांनी मांडली आहे. 

"या निवडणुकीत विजयी झालेल्या सर्वांचे हार्दिक अभिनंदन. महाराष्ट्रातील जनतेच्या हितासाठी आपण काम कराल ही अपेक्षा आहे. या संपूर्ण निवडणूक प्रक्रियेत सहभागी झालेले मतदार, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी, महाविकास आघाडीचे नेते, कार्यकर्ते व पदाधिकारी, निवडणूक आयोग,निवडणूक कर्मचारी, पोलीस कर्मचारी, प्रशासन, प्रसारमाध्यमे, सोशल मिडिया आदी सर्वांनी सक्रिय योगदान देऊन लोकशाहीचा हा उत्सव जागता ठेवून पार पाडला, याबद्दल सर्वांचे मनापासून आभार," असंही सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.  
 

Web Title: ncp Supriya Sule first reaction after the Maharashtra assembly vidhan sabha election result 2024

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.