Supriya Sule : अब्दुल सत्तारांनी केलेल्या वादग्रस्त विधानावर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2022 05:16 PM2022-11-08T17:16:11+5:302022-11-08T17:29:00+5:30

NCP Supriya Sule And Abdul Sattar : सुप्रिया सुळे यांनी अब्दुल सत्तार यांच्यावर पन्नास खोकेवरुन टीका केली होती, या टीकेला प्रत्युत्तर देताना मंत्री अब्दुल सत्तार यांनी शिवी दिली असल्याचे समोर आले आहे. यानंतर आता सुप्रिया सुळे य़ांनी यावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

NCP Supriya Sule reaction and Tweet Over Abdul Sattar statement | Supriya Sule : अब्दुल सत्तारांनी केलेल्या वादग्रस्त विधानावर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या...

Supriya Sule : अब्दुल सत्तारांनी केलेल्या वादग्रस्त विधानावर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या...

googlenewsNext

शिंदे गटाचे मंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (NCP Supriya Sule) यांच्यावर आक्षेपार्ह भाषेत टीका केल्याचे समोर आले आहे. यावरुन आता राज्यभरात राष्ट्रवादी काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी अब्दुल सत्तार यांच्यावर पन्नास खोकेवरुन टीका केली होती, या टीकेला प्रत्युत्तर देताना मंत्री अब्दुल सत्तार यांनी शिवी दिली असल्याचे समोर आले आहे. यानंतर आता सुप्रिया सुळे यांनी यावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. आपल्य़ा ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. 

"महाराष्ट्राच्या एका मंत्र्याकडून काही अपशब्द वापरले गेले, याची प्रतिक्रिया संपूर्ण महाराष्ट्रात उमटली. कारण अशा प्रकारची वक्तव्ये ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. असं बोलणं-वागणं ही आपली परंपरा नाही. अशा प्रकारची वक्तव्ये सत्तेच्या केंद्रस्थानी बसलेल्या लोकांकडून अपेक्षित नसतात. परंतु सगळेच तारतम्य पाळतात असे नाही. जरी त्यांनी काही तारतम्य पाळले नाही तरी ज्या पद्धतीने विविध संस्था, व्यक्ती, माध्यमातून याबाबत प्रतिक्रिया आल्या, संवेदना व्यक्त केल्या गेल्या ही बाब आश्वासक आहे. तिची नोंद घेणे गरजेचे आहे" असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.

"मला आवर्जून असे सांगायचे आहे की, जर कुणी चुकीचे बोलले असेल, त्यांनी महिलांचा सन्मान जपला नसेल म्हणून आपण अस्वस्थ होणं स्वाभाविक असलं तरी आपण या सगळ्या प्रवृत्ती बाजूला टाकूयात आणि महाराष्ट्राची जी सुसंस्कृत परंपरा आहे, ती जतन करुया."

"याप्रसंगी राज्यातील विविध क्षेत्रातील कार्यकर्त्यांनी, जाणकारांनी समंजसपणाची भूमिका दाखवून महाराष्ट्र हा 'सुसंस्कृतच महाराष्ट्र' आहे हे पुन्हा एकदा अधोरेखित केले याबद्दल मी मनःपूर्वक कृतज्ञता व्यक्त करते. धन्यवाद. जय हिंद-जय महाराष्ट्र!" असं देखील सुप्रिया सुळे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: NCP Supriya Sule reaction and Tweet Over Abdul Sattar statement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.