Supriya Sule : "शिंदे सरकार हे असंवेदनशील; विमानाने फिरतंय, फाईव्ह स्टारमध्ये अडीच हजारांची दाढी करतंय अन्..."

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2022 03:31 PM2022-07-10T15:31:32+5:302022-07-10T15:46:02+5:30

"शिवसेनेला मित्रपक्ष म्हणून साथ दिली आणि देत राहणार आहोत. बाळासाहेबांनी शिवसेनेचा उत्तराधिकारी ठरवला होता त्याला दुखावणे म्हणजे बाळासाहेबांना दुखावल्यासारखे आहे."

NCP Supriya Sule Slams CM Eknath Shinde And BJP Over Political Crisis | Supriya Sule : "शिंदे सरकार हे असंवेदनशील; विमानाने फिरतंय, फाईव्ह स्टारमध्ये अडीच हजारांची दाढी करतंय अन्..."

Supriya Sule : "शिंदे सरकार हे असंवेदनशील; विमानाने फिरतंय, फाईव्ह स्टारमध्ये अडीच हजारांची दाढी करतंय अन्..."

googlenewsNext

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मुख्यमंत्रीपदाची आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊन राज्याचा कारभार चालवायला सुरुवात केली आहे. या सत्ताबदलानंतर महाविकास आघाडीतील शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाचे नेते विरोधकांच्या भूमिकेत गेले आहेत. याच दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी नव्या शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली आहे. "शिंदे सरकार हे असंवेदनशील, विमानाने फिरतंय, फाईव्ह स्टारमध्ये अडीच हजारांची दाढी करतंय" असं म्हणत निशाणा साधला आहे. 

सुप्रिया सुळे यांनी आज पुण्यात प्रति पंढरपूर असलेल्या मंदिराला भेट देत विठ्ठल रुख्मिणीचे दर्शन घेतले. यावेळी माध्यमांशी साधलेल्या संवादात त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल केला आहे. "विठ्ठलाचे आशीर्वाद आणि आभार मानण्यासाठी मी आले आहे. सरकार अस्थिर आहे, दादा म्हणतोय ते खरं आहे. लोक सुरत, गुवाहाटी, गोवा फिरून आले. भारतदर्शन करून आले. बाहेरील राज्यातील पोलीस आपल्या आमदारांना हाताळत होते हे दुर्दैवी आहे" अशी प्रतिक्रियाही दिली आहे. 

"शिवसेनेला मित्रपक्ष म्हणून साथ दिली आणि देत राहणार आहोत. बाळासाहेबांनी शिवसेनेचा उत्तराधिकारी ठरवला होता त्याला दुखावणे म्हणजे बाळासाहेबांना दुखावल्यासारखे आहे. सरकार एका विमानातून उतरून दुसऱ्या विमानात बसते आहे. फाईव्ह स्टारमध्ये अडीच हजाराची दाढी करत आहे. त्यामुळे यामध्ये सर्वसामान्य कष्टकरी शेतकरी मात्र भरडला जात आहे. यांना सर्वसामान्यांचं काही घेणं देणं नाही. शिंदे सरकार हे असंवेदनशील सरकार आहे" असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे. 

सुप्रिया सुळे यांनी याआधी ट्विटरवरून टीकास्त्र सोडलं होतं. महाराष्ट्रात नव्या सरकारने स्थानापन्न होताच जनतेला वीजदरवाढीचे लगोलग तिसरे गिफ्ट देऊन टाकले आहे. यापूर्वी गॅसच्या दरात ५० रुपयांची वाढ करण्यात आली होती. दूग्धजन्य पदार्थ व अन्नधान्यांवर जीएसटी हे दोन गिफ्ट या सरकारने दिलेच होते. आता वीजदरवाढीचे हे तिसरे गिफ्टदेखील जनतेला देण्यात आले आहे. ही वीजदरवाढ निषेधार्थ आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपणास विनंती आहे की, कृपया जनतेला महागाईपासून दिलासा द्यावा, अशी मागणी ट्विटरवरून केली आहे. 

Web Title: NCP Supriya Sule Slams CM Eknath Shinde And BJP Over Political Crisis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.