"राजकारणात प्रसिद्धीझोतात राहण्यासाठी शरद पवारांचं नाव घ्यावं लागतं हे भाजपने शिकवलेलं दिसतं"

By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2022 11:47 PM2022-04-02T23:47:06+5:302022-04-02T23:47:55+5:30

Raj Thackeray : राष्ट्रवादी काँग्रेसचा राज ठाकरेंना टोला.

ncp targets mns leader raj thackeray sharad pawar name in politics bjp gudhi padwa melava | "राजकारणात प्रसिद्धीझोतात राहण्यासाठी शरद पवारांचं नाव घ्यावं लागतं हे भाजपने शिकवलेलं दिसतं"

"राजकारणात प्रसिद्धीझोतात राहण्यासाठी शरद पवारांचं नाव घ्यावं लागतं हे भाजपने शिकवलेलं दिसतं"

googlenewsNext

मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी शनिवारी गुढी पाडव्यानिमित्त आयोजित मेळाव्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला. "जातीपातीचं राजकारण राष्ट्रवादी काँग्रेसला, शरद पवारांना हवं आहे. ज्यावेळी १९९९ मध्ये जेव्हा राष्ट्रवादीचा जन्म झाला तेव्हा जातीपातीचं राजकारण महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात सुरू झालं. यापूर्वी जात ही जातीचा अभिमान होता. परंतु १९९९ मध्ये राष्ट्रवादीच्या जन्मानंतर त्यांनी जातीचा द्वेष करायला लावला," असं म्हणत राज ठाकरे यांनी संताप व्यक्त केला. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसनं राज ठाकरेंना टोला लगावला आहे. 

"भाजपचे लोक फुकट प्रसिद्धी मिळवण्यासाठी शरद पवार यांचे नाव नेहमीच घेत असतात. आपली प्रसिद्धी कमी होताना दिसल्यामुळे राज ठाकरेही आता हाच मंत्र अवलंबू लागले आहेत. राजकारणात प्रसिद्धीझोतात राहण्यासाठी शरद पवार यांचे नाव घ्यावे लागते, हे भाजपने शिकवलेले दिसते," असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते क्लाईड क्रास्टो यांनी राज ठाकरेंना टोला लगावला. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून निशाणा साधला.

 
काय म्हणाले होते राज ठाकरे?
"बाबासाहेब पुरंदरे सॉफ्ट टार्गेट होते. इतिहास ना वाचता तो लिहिलाय कोणी हे पाहिलं गेलं. ते ब्राह्मण आहेत, असं म्हणून टीका व्हायची. छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं जात पात सोडून एक व्हा, त्याच महाराष्ट्रात आज जातीपातीवरून भांडणं सुरू आहेत, राजकारण सुरू आहे. जातीतून आम्ही बाहेर पडत नाही, तर हिंदू कधी होणार," असाही सवाल त्यांनी केला. ज्या महाराष्ट्राची परंपरा वैभवशाली आहे, ज्या महाराष्ट्रानं देशाला दिशा दिली तो महाराष्ट्र आज जातीत खितपत पडला आहे, असंही ते म्हणाले.

Web Title: ncp targets mns leader raj thackeray sharad pawar name in politics bjp gudhi padwa melava

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.