राष्ट्रीय पक्षाचा दर्जा कायम ठेवण्यासाठी राष्ट्रवादीची धडपड

By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2019 09:48 AM2019-09-10T09:48:31+5:302019-09-10T09:53:51+5:30

निवडणूक आयोगाच्या नोटिशीला राष्ट्रवादीकडून उत्तर

ncp tmc Cpi Defended Their Position Of National Party status In Election Commission | राष्ट्रीय पक्षाचा दर्जा कायम ठेवण्यासाठी राष्ट्रवादीची धडपड

राष्ट्रीय पक्षाचा दर्जा कायम ठेवण्यासाठी राष्ट्रवादीची धडपड

Next

नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीतील वाईट कामगिरीमुळे राष्ट्रवादी काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, भारतीय कम्युनिस्ट पक्ष (सीपीआय) यांचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा धोक्यात आला आहे. या पक्षांचा राष्ट्रीय दर्जा काढून घेण्याबद्दल निवडणूक आयोगानं विचारणा केली होती. तुम्हाला देण्यात आलेला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा का काढून घेतला जाऊ नये, असा प्रश्न आयोगाकडून पक्षांना विचारण्यात आला होता. यानंतर सर्व पक्षांनी निवडणूक आयोगाकडे आणखी एक संधी मागितली. येत्या निवडणुकीत चांगली कामगिरी करू, असं उत्तर या पक्षांकडून आयोगाला देण्यात आलं.

राष्ट्रवादी काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, भारतीय कम्युनिस्ट पक्षानं निवडणूक आयोगाच्या नोटिशीला दिलेलं उत्तर जवळपास सारखंच आहे. 'देशाच्या राजकारणात आपलं मोठं योगदान आहे. त्यामुळे गेल्या काही निवडणुकांमधील कामगिरीच्या आधारावर आपलं मूल्यमापन केलं जाऊ नये,' असा दावा या पक्षांकडून करण्यात आला आहे. गेल्या दोन लोकसभा निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीची कामगिरी खालवली. त्यावर भाष्य करताना राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते माजिद मेनन यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष 15 वर्षे राज्यात सत्तेत होता. याशिवाय राष्ट्रवादीला स्थापनेपासूनच राष्ट्रीय दर्जा मिळाला असल्याचं म्हटलं. स्थापनेनंतर लगेचच झालेल्या निवडणुकीतही पक्षाची कामगिरी राष्ट्रीय दर्जासाठी आवश्यक असलेल्या निकषांनुसार झाली, असा दावादेखील त्यांनी केला. 

सीपीआयचे महासचिव डी. राजा यांनी निवडणूक आयोगाच्या नोटिशीला उत्तर दिलं. 'सीपीआय काँग्रेसनंतर देशातील सर्वात जुना पक्ष आहे. देशाच्या स्वातंत्र्य चळवळीतही पक्षानं महत्त्वाची भूमिका बजावली होती. लोकसभेत सीपीआयनं विरोधी पक्षाची जबाबदारीदेखील पार पाडली आहे. देशाचं संविधान मजबूत करण्यात पक्षाचा मोठा आहे. त्यामुळे आमचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा कायम राहावा,' असं उत्तर राजा यांनी निवडणूक आयोगाला दिलं आहे. 
 

Web Title: ncp tmc Cpi Defended Their Position Of National Party status In Election Commission

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.